Uddhav Thackeray Eknath Shinde News
Uddhav Thackeray Eknath Shinde News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Breaking News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी

Satish Daud

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण, शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यांनी संदीप गुळवे यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केलाय. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election Result) तब्बल २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी (ता. १ जुलै) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. तब्बल २४ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. पहिल्या फेरीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेतली होती. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते.

शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) संदीप गुळवे हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. मध्यंतरी गुळवे यांनी आघाडी घेतली. त्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली होती. मात्र, त्यानंतर किशोर दराडे यांनी मोठी आघाडी घेतली. मात्र, विजयासाठी त्यांना ३१ हजार ५७६ इतके मताधिक्य घेणे गरजेचे होते.

पहिल्या पसंतींच्या मतांमध्ये किशोर दराडे यांना विजयी आकडा गाठण्यासाठी जवळपास ५ हजार मताधिक्य कमी होते. दरम्यान, दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत दराडे यांनी विजयाचा आकडा गाठला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मतमोजणी प्रक्रियेत एकूण ५ मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या. यामध्ये निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली होती. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ मतमोजणी थांबली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मतमोजणीस सुरुवात करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rrichest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

Special Report : खेळाडूंना 11 कोटी, शेतकऱ्यांना काय? क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण; वडेट्टीवार, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT