Nashik TCS Case  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik TCS Case: आसिफ ऑफिसमध्ये माझ्या मांडीवरून हात फिरवायचा अन्...; नाशिक TCS प्रकरणात महिला कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Nashik TCS Harassment Case: नाशिकच्या टीसीएस या आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीत सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात धक्कादायक खुलासा

  • महिला कर्मचाऱ्याने तक्रारीत केले गंभीर आरोप

  • सहकाऱ्यांकडून अयोग्य वर्तन आणि छळाचा दावा

  • ऑफिसमध्ये अंगाला कुठेही स्पर्श करत असल्याचा आरोप

नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिला कर्मचाऱ्याने कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. बीपीओ युनिटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आरोप केला की, तिच्या ५ सहकाऱ्यांनी अनेक महिने तिचा लैंगिक छळ केला आणि तिच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचे. त्यांनी तिच्या धर्माबद्दल अपमानजनक टिप्पणी केली. तिचा सहकारी आसिफ अन्सारी तिच्या मांडीवर हात ठेवायचा आणि एकदा तर त्याने तिला जबरदस्तीने मिठी देखील मारली होती.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या महिला कर्मचाऱ्याने तिच्या जबाबात म्हटले आहे की, २० जून २०२५ रोजी ती टीसीएसमध्ये कामाला लागली. शाहरुख कुरेशी आणि इतर सहकाऱ्यांसोबत तिची ट्रेनिंग २४ जून रोजी सुरू झाली. तिने असा आरोप केला की, या काळात लोन डिपार्टमेंटमधील टीम लीडर रझा मेमन कोणतीही औपचारिक भूमिका नसतानाही वारंवार ट्रेनिंग रूममध्ये येऊन वैयक्तिक आणि अपमानजनक टिप्पणी करत होता.

या महिलेने जबाबात असेही सांगितले की, रजा मेमन अनेकदा मला विचारायचा, 'तुझा नवरा शहराबाहेर असल्याने तू एकटीच सगळं कसं सांभाळतेस? तुला भीती वाटत नाही का? तुला काहीही लागलं तर मी कधीही मदत करायला तयार आहे.' रझा आणि शाहरुख कुरेशी यांनी तिला विचारले की, हे तुझे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. रझाने तिला 'प्लेअर' हे टोपणनाव दिले होते आणि त्याच नावाने तिला तो आवाज द्यायचा. तो मला म्हणायचा, 'मी जर तुझा नवरा असतो, तर मी तुला कधीच एकटं सोडलं नसतं.' या काळात तो अगदी माझ्या जवळ उभा राहून बोलायचा.

या महिलेने तिचा सहकारी आसिफ अन्सारीवर देखील गंभीर आरोप केले. आसिफ वारंवार तिच्या अंगाला अयोग्यरित्या स्पर्श करायचा. तिने सांगितले की, 'तो मुद्दाम माझ्या अंगाला स्पर्श करायचा आणि माझा हात धरण्याचा प्रयत्न करायचा. अनेकदा तो माझ्या मांडीवर किंवा खांद्यावर हात ठेवायचा. एकदा तर त्याने मला जबरदस्तीने मिठीही मारली होती. अन्सारीने तिला 'मी तुला आवडत नाही का? मी तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त देखणा आहे. माझ्यासोबत बाहेर चल, काही झाले तरी कोणाला कळणार नाही.', असे बोलायचा.

तसंच, तिने आसिफ अन्सारीवर असा देखील आरोप केला की, 'लंच टाईममध्ये तो माझ्या बाजूला येऊन बसायचा आणि म्हणायचा, 'तुझ्या काही शारीरिक गरजा असतील, तर मी त्या पूर्ण करीन.' महिलेने तिच्या तक्रारीत इतरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या महिलेने दावा केला आहे की अन्सारीने तिच्या धर्माला लक्ष्य केले होते आणि त्याने आक्षेपार्ह टिप्पणी देखील केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विकास लवांडे यांना अटक करा, वारकरी सांप्रदायाकडून वाघोली पोलीस ठाण्यात आंदोलन

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

SCROLL FOR NEXT