Nashik Police Latest News | Police suspended Saam TV
महाराष्ट्र

Nashik: पोलीस चौकीत दारु पार्टी करणाऱ्या 'त्या' चार पोलिसांचे निलंबन...

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक: नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या डी के नगर पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी मद्य प्राशन करत असल्याचा विडिओ व्हायरल झाला होता. अखेर त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. काल रात्रीच्या सुमारास हे पोलीस कर्मचारी चौकीतच मद्य प्राशन करत होते. चौकशी करून तातडीने या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. टपरी सारख्या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी काम करत आहेत हे देखील बरोबर नाही. लवकरच शहरातील सर्व चौकी अद्यावत करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितले आहे.

दरम्यान दारू पिऊन टवाळखोर त्रास देत असल्याने त्यांची तक्रार देण्यासाठी जेष्ठ नागरिक पोलिसांकडे (Police) गेले होते. मात्र, चौकीत पोलिसच दारू पिताना आढळून आले आहेत. चोराचे उलट्या बोंबा मद्यपी पोलिसांकडून जेष्ठ नागरिकाला धक्का बुक्की आणि मारहाण करण्यात आली होती. गंगापूर रोड परिसरात असलेल्या शांती निकेतन कॉलनीतील (colony) उद्यानामध्ये टवाळखोर दारू पिउन धिंगाणा घालत होते. या घटनेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या जेष्ठ नागरिकांना वेगळेच चित्र बघायला मिळाले होते. चक्क पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी दारू पित होते. (Police liquor party in Nashik)

जेष्ठ नागरिकांनी याबाबत विचारले असता, त्याचा राग आल्याने चौकीचे दार आणि लाईट बंदकरून जेष्ठ नागरिक बाळासाहेब शिंदे यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली होती. जेष्ठ नागरिकांनी आरडा- ओरड केल्याने परिसरातील नागरिक तिथे जमा झाले आणि नागरिकांची गर्दी बघता पोलिसांनी (police) चौकीतच दारूच्या बाटल्या ग्लास सोडून पळ काढला. या सगळ्या घटनेच स्थानिकांनी व्हिडिओ (Video) चित्रीकरण केले आणि तक्रार दाखल करण्यासाठी गंगापूर पोलिस ठाण्यात गेले. या घटनेनंतर रात्री नागरिक रस्त्यावर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT