PAK vs AUS : खेळपट्टीवर पॅट कमिन्सचा हातोडा; पाक बोर्डाला आठवला 'थॉर'

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने 97/2 वर डाव घोषित केला आणि पाकिस्तानला विजयासाठी 506 धावांचे लक्ष्य ठेवले.
Pat Cummins
Pat CumminsSaam TV
Published On

ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) खेळपट्टीवर हातोड्याने काहीतरी ठोकताना दिसला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यातील कराची येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी हा प्रकार घडला. कसोटीमध्ये गोलंदाजांचे लँडिंग ज्या क्षेत्रात होते तिथे खेळपट्टीमध्ये बिघाड होणे सामन्या आहे. कारण दोन्ही संघांचे गोलंदाज अनेक षटके गोलंदाजी करतात आणि मुख्य म्हणजे सर्व गोलंदाजांचे लँडिंग हे एकाच क्षेत्रावर होते. ज्यावेळी कमिन्सने हा प्रकार केला त्यावेळी 316.3 षटके टाकण्यात आली होती.

दिवसाच्या सुरुवातीला, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने 97/2 वर डाव घोषित केला आणि पाकिस्तानला विजयासाठी 506 धावांचे लक्ष्य ठेवले. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने 21 धावसंख्येवर इमाम-उल-हक (1) आणि अझहर अली (6) यांच्या विकेट गमावल्या. कर्णधार आझमने सलामीवीर अब्दुल्ला शफीकसोबत 93 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कमिन्सने लँडिंग क्षेत्र हातोड्याने सरळ करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडला त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन गोलंदाजी करत होता. खेळपट्टी काळजी घेण्याचे पुर्ण काम मैदानाची काळजी घेणारे लोक (Groundsman) करत असतात परंतु इथे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने स्वत:च ते काम केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात चांगलीच रंगत आली आहे. 506 धावांचे अशक्यप्राय लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात यजमानांनी आठ गडी राखून 230 धावांचा टप्पा पार केला आहे. पाकिस्तानच्या विजयाची अजूनही फारशी शक्यता दिसत नसली तरी, ऑस्ट्रेलियाने चार दिवस खेळावर वर्चस्व गाजवल्यानंतर खेळ कसा रंगतो हे पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com