Nashik Shocking News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: आईनं पोटच्या ५ मुलांना विकलं, नाशिकमधील संतापजनक प्रकार; धक्कादायक कारण समोर

Nashik Police: नाशिकमध्ये आईने पोटच्या ५ मुलांची विक्री केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली. पोलिसांनी महिला आणि तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये आईने ५ मुलांची विक्री केल्याचा संशय

  • त्र्यंबकेश्वरमधील ही धक्कादायक घटना

  • पैशांसाठी मुलांची विक्री केल्याचा संशय

  • आशासेविकेमुळे प्रकरण उघड

  • पोलिसांनी महिला आणि तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आईने पोटच्या मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील परिस्थिती हालाकीची असल्यामुळे पैशांसाठी आईने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडली आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी महिला आणि तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असून त्यांनी हे कृत्य का केले यामागचे धक्कादायक कारण सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव परिसरातील बरड्याची वाडीतील हा धक्कादायक प्रकार आहे. आईने १४ पैकी ५ मुलांना विकल्याचा संशय आहे. घरातील परिस्थिती हालाखीची असल्याने पैशांसाठी तिने मुलांना विकल्याचा संशय घेण्यात आला. एका आशासेविकेमुळे हा प्रकार उघडकीस आला. महिलेची १४ वी प्रसूती झाल्यानंतर २ महिन्यांनी आशासेविका घरी बाळाची तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

२ महिन्यांचं बाळ आता आमच्याजवळ नसल्याची माहिती महिलेने आशासेविकेला दिली. १० ऑक्टोबरला महिलेला मुलगा झाला होता. मात्र बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागाने बाळाच्या तपासणीसाठी आशासेविकेला महिलेच्या घरी पाठवलं होते. मात्र बाळ आमच्याकडे नसल्याची माहिती महिलेनं दिल्याने मुलांच्या विक्रीचा संशय व्यक्त केला गेला. तर हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पैशांसाठी महिलेनं ४ ते ५ मुलांना विकल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी दावा केला.

या घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेत चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. मुलांच्या विक्रीचा संशय असलेल्या महिला आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं. नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा महिलेच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली. मात्र मी मुलांची विक्री केली नाही तर नातेवाईकांना दत्तक दिल्याचा खुलासा बच्चूबाई हंडोगे या महिलेने केला. ३ मुलांना मी दत्तक दिल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. विक्री करून पैसे घेतले नाही, आमची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मुलं दत्तक दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trending Saree Designs: पेस्टल ते मेटॅलिक, टिश्यू सिल्क साड्यांचे 'हे' आहेत ५ लेटेस्ट पॅटर्न; केवळ लग्नासाठीच नाही तर ऑफिससाठीही नक्की ट्राय करा!

Skin Care : तेलकट त्वचेसाठी नैसर्गिक घरगुती टिप्स, ट्राय करुन बघा

Maharashtra Live News Update : भाजपनंतर शिवसेनेनं खातं उघडलं! जळगावात गौरव सोनवणे बिनविरोध

Viral : गर्लफ्रेंडसोबत नव्या वर्षाच्या पार्टीत दंग, बायकोनं रंगेहात पकडले, कारची काच फोडली अन्

Shocking: नवीन वर्षाचे स्वागत करताना बारमध्ये भीषण स्फोट, किंकाळ्या अन् आगीच्या ज्वाळा; अनेकांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT