Nashik Sting Operation News : Saamtv
महाराष्ट्र

Nashik Sting Operation : पिकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट; साम टीव्हीने 'स्टिंग' ऑपरेशन करून केला पर्दाफाश

Vinod Patil

नाशिक : राज्यात मोठा गाजावाजा करून 1 रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारनं सुरू केली. मुख्यमंत्र्यांपासून सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांपर्यंत सर्वच या योजनेचा सर्वच ठिकाणी दाखला देत असतात. मात्र शेतकऱ्यांना खरंच 1 रुपयांला पीक विमा मिळतोय का? तर नाही....साम टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी 1 रुपयात विमा काढण्याच्या आशेनं सीएससी केंद्रावर जातात तेव्हा काय होतं, याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही चांदवडच्या एका सीएससी केंद्रावर गेलो.

आता तुम्हाला वाटलं असेल की हे केवळ चांदवडच्या एकाच सीएससी केंद्रावर घडत असेल. मात्र आम्ही चांदमधल्या दुसऱ्या सीएससी सेंटरवर गेलो. तिथे काय घडलं तेही पाहा. आम्हाला प्रश्न पडला की केवळ चांदवडच्या शेतकऱ्यांचीच लूट सुरू आहे की, इतर ठिकाणीही असा प्रकार सुरू आहे? मग आमच्या टीमनं थेट मालेगावमध्ये धडक दिली. आता मालेगावच्या सीएससी केंद्रावर काय सुरू आहे तेही पाहा.

तर हा लुटीचा अनुभव आम्हालाच आलाय का? तर नाही...त्यासाठी आम्ही काही शेतकऱ्यांना गाठलं आणि त्यांना विचारलं..ते काय म्हटले त्यांच्याच तोंडून ऐकूयात...

साम टीव्हीनं या लुटीचा पर्दाफाश केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कडक कारवाईची मागणी केली. तर सामनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही लूट समोर आल्यानंतर अशा केंद्रावर कारवाईचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. त्यानंतर आम्ही एवढ्यावरच थांबलो नाहीत. तर थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना संपर्क केला....शेतक-यांचा पीकविम्याच्या नावाखाली केलेल्या लुटीची त्यांनीही गंभीर दखल घेतली.

मुळात या योजनेअंतर्गत संबंधित विमान कंपनीकडून सीएससी केंद्रांना प्रत्येक अर्जदाराच्या मागे 40 रूपये दिले जातात. मग शेतकऱ्यांची लूट कशासाठी? असा संतप्त सवाल शेतक-यांनी केला आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळून निघाला आहे. गेल्या हंगामाच्या विम्याची रक्कमही त्याला वेळेत मिळालेली नाही. काहींना नुकसान भरपाई म्हणून 70 ते 80 रूपये देऊन त्याची क्रूर थट्टा केली आहे. मग पुन्हा ही लूट कशासाठी?

खरिपाच्या पेरणीसाठी पदरमोड करून, बँकांचं कर्ज काढून शेतकरी बी-बियाणे आणि खतांसाठी जुळवा जुळव करत आहे. मात्र मेटाकुटीला आलेल्या बळीराजाची 1 रूपयांच्या पीकविम्यासाठी 100 रूपयांची लूट होत असेल तर अशा दरोडेखोरांवर कडक कारवाईची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT