अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक
राज्यभरात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग सुरू झालीय. नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर धरणातून २४ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजल्यापासून ८४२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आलाय. रामकुंड आणि गोदा घाटावरील अनेक मंदिरं पुराच्या पाण्याखाली गेल्याची माहिती मिळतेय.
नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग
नाशिकमधील बुधा घाटावरील छोटे पूल देखील पाण्याखाली गेल्याचं समोर आलंय. पाण्याची पातळी वाढल्याने २४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा रामकुंड परिसरातील दुकान प्रशासनाने हलवली. गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम (Nashik Rain) आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे सतर्कतेचा इशारा दिलाय.
पुरामुळे रामकुंडाचा परिसर पाण्याखाली
गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामकुंडाचा परिसर पाण्याखाली गेलाय. दररोज रामकुंड परिसरामध्ये होणाऱ्या पूजाविधींना पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामकुंडावर येणाऱ्या रस्त्यापर्यंत गोदावरी नदीच्या पुराचे पाणी आले (Nashik News) आहे. रस्त्यावर पूजाविधी करण्याची वेळ भाविकांवर आलीय. पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे रामकुंड परिसरातील दुकानं आणि टपऱ्या हलवल्या गेल्या आहेत.
गोदावरी नदीला पूर
राज्यातील अनेक भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला देखील पूर ( Godavari River Flood) आलाय. कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुरेसा पाऊस झाल्यामुळे पाणीसंकटाचं सावट काहीसं टळल्याचं चित्र आहे. परंतु मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिलेल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.