Nashik Police x
महाराष्ट्र

Nashik : भाजप नेत्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, आरपीआय नेत्याला अटक; नाशिकमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर

Nashik News : नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात गुन्हेगारीत राजकीय कनेक्शन उघड आले आहे.

Yash Shirke

  • नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीत राजकीय कनेक्शन उघड

  • पोलीस तपासात आली धक्कादायक बाब समोर

  • गुन्हेगारी कमी करण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik Police : नाशिक शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीचे आता राजकीय कनेक्शन उघड झाले आहे. गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक केली आहे. त्यांनी नेत्याच्या मुलालादेखील ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या गोळीबार प्रकरणामध्ये भाजप नेत्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आले आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीचे थेट कनेक्शन राजकीय नेत्यांशी असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सातपूर गोळीबार प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते प्रकाश लोंढे यांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणात भीतीचे वातावरण निर्माण करुन बार मालकाकडून पैसे उकळण्याचा लोंढे यांनी कट आखला होता. या गोळीबारात बारमालकाला गोळी लागली. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि आरपीआय आठवले गटाचे नेते प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांना अटक केली.

दुसऱ्या बाजूला, रामवाडी-गंगापूररोड परिसरात सचिन साळुंखे याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय बागुलसह इतर तीन ते चार संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भाजप नेत्याच्या पुतण्या गोळीबारात सहभागी असल्याने गुन्हेगारी विश्व आणि राजकीय विश्व यांचे कनेक्शन स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT