Horrific scene from Nashik-Peth highway accident as two cars collide head-on, leaving four dead and several injured. saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Nashik Accident Tragedy: नाशिक-पेठ महामार्गावर दोन कारची समोरासमोर टक्कर होऊन एक भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ६ महिला गंभीर जखमी झाल्या. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालाय.

Bharat Jadhav

  • नाशिक-पेठ महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक

  • दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर

  • चार जणांचा जागीच मृत्यू

नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगन शिवारात दोन कार भीषण अपघात झाला. दोन कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झालाय. भयानक दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कारमधील व्यक्ती हे गुजरातच्या वापी येथील होते. शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन ते आपल्या कारने नाशिकमार्गे परतत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आंबेगन शिवारात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारशी धडक झाली.

या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातातील सहा जखमी महिलांना तात्काळ नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चार महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता मोकळा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार?

SCROLL FOR NEXT