Ozar gang phisical assault case Police investigation Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिक ओझरमध्ये 'त्या' तरुणीवर सामुहिक बलात्कार नव्हे, तर...; पोलीस तपासात मोठी माहिती समोर

Nashik Gang Rape of a Young Woman : नाशिकमध्ये घरात घुसून अल्पवयीन पीडित तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, तापासाची चक्रे फिरवत या घटनेत एक मोठी माहिती उघडकीस आली आहे.

Prashant Patil

नाशिक : नाशिकमधील शिरसगाव चौकी ओझर शिवार ओझर ता. निफाड येथे तरुणीच्या घरी अल्पवयीन पीडित मुलीवर एक अल्पवयीन मुलगा व त्याचे इतर चार (अल्पवयीन) मित्रांनी अतीप्रसंग केला म्हणून गुन्हा दाखल झाला होता. पण या घटनेत एक मोठी माहीती समोर आली आहे. ती म्हणजे, सदर गुन्ह्यांचा तपास परिक्षेत्र पोलीस उपअधिक्षक अद्विता शिंदे यांच्याकडे होता. याबाबत सदर गुन्ह्यांचा सखोल तपास करत अद्विता शिंदे व एलसीबीचे अधिकारी यांनी पिडीतेला विश्वासात घेत विचारले असता पिडितेने एकाच मुलाने अतिप्रसंग केला असल्याचं सांगितलं आहे.

तपासाची चक्रे जलद गतीने सुरू झाले आणि ज्याने गुन्हा केला त्यासंबधीत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन ओझर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. सदर प्रकार सामुहिक अतिप्रसंग नसल्याचं स्पष्ट झालं असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याचं आधी समोर आलं होतं. घरात घुसून नराधमांनी मुलीच्या शरीराचे लचके तोडले. कुणाला सांगू नये म्हणून त्या नराधमांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशकात खळबळ उडाली होती. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली. बलात्कार केल्यानंतर पाच संशयित आरोपी फरार झाले अशी माहिती समोर आली होती. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाऊनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पण सखोल चौकशीनंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. पिडीतेने एकाच मुलाने अतिप्रसंग केला असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT