Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : क्लास वरून घरी जाताना काळाचा घाला; नाशिकमध्ये भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू

Nashik News : मूळची पश्चिम बंगालची राहणारी असून काही दिवसांपासून आई- वडीलांसोबत नाशिकला राहत होती. तर कालच सुहाना भावासोबत पश्चिम बंगालहून नाशिकला आली होती आज क्लासला गेली असताना काळाने घाला घातला

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : क्लास सुटल्यानंतर दुचाकीने घरी निघालेल्या तरुणीवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला चोप दिला. यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तर काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

नाशिक शहरातील वडाळा रोड परिसरात सदर अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे. या अपघातात सुहाना शेख (वय १६) असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. सुहाना हि मूळची पश्चिम बंगालची राहणारी असून काही दिवसांपासून आई- वडीलांसोबत नाशिकला राहत होती. तर कालच सुहाना आपल्या भावासोबत पश्चिम बंगालहून नाशिकला आली होती. यानंतर आज क्लासला गेली असताना तिच्यावर काळाने घाला घातला. 

डोक्यावरून गेले चाक

दुपारच्या वेळी सुहाना हि खासगी क्लासला जात असे. रोजप्रमाणे दुचाकी घेऊन ती गेलेली होती. दुपारी क्लास सुटल्यानंतर सुहाना घरी जाण्यासाठी वडाळा रोड परिसरातुन जात होती. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच सुहाना हिचा तोल जाऊन ती खाली पडली. रस्त्यावर खाली पडताच सुहाना ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडली. यात तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

नागरिकांनी ट्रक चालकाला दिला चोप 

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लागलीच धाव घेतली. अपघात झाल्याने वडाळा रोड परिसरात स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला. यामुळे वडाळा रोड परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतप्त नागरिकांना शांत करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT