Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Kalyan : भाडे आकारणीवरून रुग्णवाहिका चालकांमध्ये जुंपली; तीन तास मृतदेह शवगृहात पडून, केडीएमसीच्या रुग्णालयाबाहेरचा प्रकार

Kalyan News : नातेवाईकांनी मृतदेह तेलंगणा येथे गावी नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथेच खाजगी ॲम्बुलन्स चालकांच्या दादागिरीचा खेळ सुरू झाला.
Published on

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खाजगी रुग्णवाहिका चालकांची दादागिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या मजुराचा मृतदेह तीन तास शवगृहात पडून राहिला. रुग्णवाहिका भाड्यावरून दोन चालकांमध्ये वाद झाला. या वादामुळे मृतदेह जवळपास ३ तास शवगृहाच पडून होता. त्यानंतर कसाबसा मृतदेह तेलंगणाला रवाना झाला. मात्र या घटनेमुळे खाजगी रुग्णवाहिका चालकांनी भाडे आकारणीवरुन दादागिरी समोर आली आहे.

कल्याणमध्ये कामानिमित्ताने आलेल्या तेलंगणा येथील करिया बिच्चप्पा हा कामगार म्हणून काम करत असताना इमारतीवरून पडून त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथेच खाजगी ॲम्बुलन्स चालकांच्या दादागिरीचा खेळ सुरू झाला.

Kalyan News
Crime News : मंदिरात येत प्रथम दर्शन; महादेवाच्या मंदिरातील चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, पिंपरी चिंचवडमध्ये दोन मंदिरात चोरी

कमी भाडे घेतल्याने एका चालकाने घातला वाद 

दरम्यान रोशन शेख या खाजगी रुग्णवाहिका चालकाने मृतदेह तेलंगणाला नेण्यासाठी तब्बल २५ हजार रुपये भाड्याची मागणी केली. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने मृताच्या नातेवाईकांनी रक्कम कमी करण्याचा आग्रह केला. परंतु चालक माघार घेण्यास तयार नव्हता. यामुळे समीर मेमन नामक दुसऱ्या चालकाने केवळ १५ हजार रुपयांत सेवा देण्याची तयारी दर्शवली. नातेवाईकांनी त्याला होकार दिला. परंतु पहिला चालक रोशन शेख याने त्याला थेट मज्जाव केला.

Kalyan News
Rajiv Gandhi Zoo : पाच दिवसात १४ हरणांचा मृत्यू; पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना

वादात मृतदेह तीन तास शवगृहात 

रुग्णवाहिका चालकांमध्ये झालेल्या या वादामुळे तब्बल तीन तास मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात पडून राहिला. शेवटी नातेवाईक आणि मित्रांनी मध्यस्थी केल्याने मृतदेह तेलंगणासाठी रवाना करण्यात आला. याच रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी भाडे भरण्यास पैसे नसल्यामुळे एका महिलेचा मृतदेह वेळेवर हलवता न आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अर्थात रुग्णालयाबाहेर खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून भाड्याच्या नावाखाली सुरू असलेली दादागिरी कोण थांबवणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com