Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : येवला पोलिसांनी १४ किलो गांजा जप्त; चौघांना गाडीसह घेतले ताब्यात

Nashik News : येवला तालूका पोलिसांना अंमली पदार्थ घेऊन लाल रंगाची गाडी जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी येवला- मनमाड रस्त्यावर गोपाळवाडी शिवारात सापळा रचला.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला तालुका पोलिसांनी धडक कारवी करत गांजाची वाहतूक (Nashik) करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत (Police) पोलिसांनी १४ किलो गांजा जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

येवला तालूका पोलिसांना अंमली पदार्थ घेऊन लाल रंगाची गाडी जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी येवला- मनमाड रस्त्यावर गोपाळवाडी शिवारात सापळा रचला. या दरम्यान येवला- मनमाड (Manmad) रस्त्यावरून जात असलेली संशयितरित्या गाडी आढळून आली. यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत दोन पिशव्यांमध्ये १४ किलो गांजा आढळून आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ लाखाचा गांजा 

पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची बाजारातील मूल्य १ लाख रुपयांच्या जवळपास आहे. या गांजासह गाडी जप्त केली असून याप्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच हा गांजा कोणाला देण्यासाठी कुठे जात होते याचा तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लोकसभेत गदारोळ, कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब

HBD Dhanush : साऊथचा किंग धनुष किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून डोळे भिरभिरतील

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

Today Gold Rate: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल झाला का? वाचा आजचे दर

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT