Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : पंधरा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा नाही; संतप्त ग्रामस्थांनी सरपंचासह ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले

Nashik News : नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या गावात हा प्रकार घडला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढत आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या जाणवत आहे. दरम्यान काहीही सूचना न देता गावात मागील पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पाण्यासाठी मोठे पाऊल उचलत गावच्या सरपंचासह ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले. 

नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या गावात हा प्रकार घडला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. काही ठिकाणी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी टंचाई जाणवू लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशाच प्रकारे येवला तालुक्यातील आडगाव येथे पाणी समस्या निर्माण झाली आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले 

येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा केलेला नाही. यामुळे ग्रामस्थांना पाणी आणण्यासाठी शेतशिवारात जावे लागत आहे. याची तक्रार देखील ग्रामस्थांनी केली. तरी देखील पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून ठेवले आहे.  

पाणीपट्टी थकल्याने पाणीपुरवठा खंडित 

दरम्यान जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही; तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप खोलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. मात्र ग्रामस्थांच्या पाणी पट्ट्या थकीत असल्यामुळे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे बिल न देऊ शकल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT