Trimbakeshwar News Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar News : तिरुपती, शिर्डीप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्येही भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद; आजपासून वाटपास सुरवात

Nashik News : आतापर्यंत याठिकाणी येणाऱ्या भाविकांना प्रसाद स्वरूपात काहीच दिले जात नव्हते. तर बारा ज्योतिर्लिंगांवर प्रसाद दिला जात होता. त्यानुसार त्रंबकेश्वर येथे देखील प्रसाद असावा; अशी मागणी

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : तीर्थस्थळी दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अल्पदरात काही ना काही प्रसाद दिला जात असतो. त्यानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना देखील प्रसाद वाटप करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. तिरुपती, पंढरपूर व शिर्डीप्रमाणे भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. 

नाशिक- त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. याची तयारी सुरु आहे. हि तयारी सुरु असताना आजच्या गुढीपाडवा निमित्ताने त्रंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बुंदीचा लाडू प्रसाद स्वरूपात देण्यास सुरवात करण्यात आली आहे. आतापर्यंत याठिकाणी येणाऱ्या भाविकांना प्रसाद स्वरूपात काहीच दिले जात नव्हते. तर बारा ज्योतिर्लिंगांवर प्रसाद दिला जात होता. त्यानुसार त्रंबकेश्वर येथे देखील प्रसाद असावा; अशी मागणी भाविकांची होती. त्याला अनुसरून विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 

प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू 

त्रंबकेश्वरमध्ये देखील मंदिर समितीकडून प्रसाद मिळण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तिरुपती, पंढरपूर तसेच शिर्डी याठिकाणी भाविकांना अल्प दरात भाविकांना बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून दिला जात होता. त्या नुसार आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्निल शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकाराने आजपासून प्रसाद सेवा सुरू करण्यात आली आहे. 

पाचशे पाकिटांची ऑर्डर  
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुंदी लाडू प्रसाद देवस्थानकडून सेवा सुरू करण्यात आली आहे. दोन बुंदीचे लाडूंचे एक पाकीट २० रुपयाला आहे. पहिला दिवस असल्याने यासाठी ५०० पाकिटांची ऑर्डर देण्यात आली होती. हे पाचशे पाकीट अवघ्या काही वेळेतच संपल्याचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT