Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik: जप्‍त केलेल्‍या विदेशी मद्याचे ६५ बॉक्‍स चोरी; गोडावुनच्या खिडकीचे गज कापून चोरी

जप्‍त केलेल्‍या विदेशी मद्याचे ६५ बॉक्‍स चोरी; गोडावुनच्या खिडकीचे गज कापून चोरी

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे कार्यालयातून दारूची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याच (Nashik) कार्यालयातून वारंवार दारूची चोरी (Theft) होत असल्याने त्याबाबत शंका उपस्थित होत आहे. (Live Marathi News)

पंचवटी इथल्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पेठरोड (Crime) प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ आदिवासी कॉलनी, बिल्डींग नं १ या ठिकाणी राज्य उत्पादन विभागाकडुन जप्त केलेला मुद्देमाल ठेवलेल्या गोडावुनच्या खिडकीचे गज कापुन तब्बल ४ लाख ८८ रुपये किंमतीचे विदेशी मद्याचे एकुण ६५ बॉक्स चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

गतवर्षीही दारूची चोरी

याच कार्यालयतून मागच्यावर्षी देखील दारूची चोरी झाली होती. त्यामुळे चोरी विषयी शंका उपस्थित होत आहे. आदिवासी कॉलनीत अनेक सरकारी कार्यालय आहेत. मुलामुलींचे वसतिगृह आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे या परिसरात वारंवार चोऱ्या होत असता. दारूच्‍या चोरीबाबत पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये जयराम श्रावण जाखेरे यांच्या फिर्यादीहून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस पी. एस. देवरे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT