Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! नासर्डी नदीत मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू

या घटनेने मिलिंदनगर परिसरात शाेककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज  शेख

नाशिक - तिडके काॅलनीलगतच्या मिलिंदनगर येथील नासर्डी नदीत मित्रांसह पाेहण्यास गेलेल्या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्याच्या भाेवऱ्यात सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. सागर चाैधरी असे मृत मुलाचे नाव असून ताे इयत्ता सातवीत शिक्षण घेत हाेता. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने मिलिंद नगर येथील सात ते आठ मुले व सागर हे येथील मित्तल टाॅवर जवळील नासर्डी नदी (Nasardi River) परिसरात खेळायला गेले.

हे देखील पाहा -

दरम्यान, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने काही मुले पाण्यात पाेहण्यास उतरली. तेव्हा सागरही पाण्यात उतरला. त्याचवेळी ताे नदी पात्रातील खाेल पाण्यात बुडून वाहत वाहत मिलिंद नगरजवळील भवऱ्यात सापडला.

याचवेळी बाकीच्या मुलांनी आरडाओरडा करुन घडलेल्या घटनेची माहिती नागरिक व अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक व मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मिलिंदनगरजवळील नदीपात्रातून सागरला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला डाॅ. पाटील यांनी मृत घाेषित केले. या घटनेने मिलिंदनगर परिसरात शाेककळा पसरली असून मुंबई नाका पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT