Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटले; पाच महिन्‍यानंतर आरोपी ताब्‍यात

बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटले; पाच महिन्‍यानंतर आरोपी ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : वृद्धाला बनावट बंदुकीचा धाक दाखवून लाखोंची रोकड लंपास करून केल्याची घटना नाशिकमध्‍ये (Nashik) घडली होती. यात पाच महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना नाशिक पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सुमारे ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या होळाराम कॉलोनी परिसरातील आंबेडकर चौक येथे कन्हैय्यालाल तेजदास मनवानी यांच्या गाडीचा चालक देविदास मोहन शिंदे याने व त्याच्या साथीदाराने संगनमत करत शिंदे यांच्या साथीदाराने मनवानी यांच्या छातीला नकली बंदूक लावली. यानंतर त्यांच्याकडची कापडी पिशवीत असलेली ६५ लाख रुपयांची रोकड हिस्काऊन आणि मनवानी यांना गाडीच्या बाहेर ढकलून देत जबरी चोरी केली होती. त्यानंतर कन्हैय्यालाल तेजदास मनवानी यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दिली होती.

नाशिकमध्‍ये सापडले दोघे

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत संशयितांचा शोध सुरू केला. कोल्हापूर, पुणे, कात्रज अश्या ठिकाणी संशयितांचा गेल्या काही महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते. यातच खबरीमार्फत पोलिसांना दोघा संशयितांचे धागेदोरे हाती लागले होते. त्यानंतर हे दोघे नाशिकच्या सातपूर परिसरात आलेले असल्याची गुप्त माहिती मिळाली. नाशिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापळा रचून सुमारे ५ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित युवराज मोहन शिंदे आणि देविदास मोहन शिंदे यांना कारसह ताब्यात घेतले.

मुद्देमाल जप्‍त

त्यांच्याकडून चोरी केलेल्या रकमे पैकी ५३ लाख रोख, चोरीच्या गुन्ह्यातील पैशाने विकत घेतलेली ४ लाख रुपयांची कार, ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल, १ हजार रूपये किमतीची ट्रॅव्हल बॅग असा एकूण ५७ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलीस कर्मचारी यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सत्कार देखील करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

Bank Fraud : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? घाबरू नका! RBI च्या नियमांनुसार मिळू शकतो पूर्ण रिफंड

Maharashtra News Live Update: 'सकाळ मॅरेथॉन'च्या दुसऱ्या पर्वात धावले हजारो सोलापूरकर

Coffee Side Effects : नाश्ता करण्याआधी कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की धोक्याचे? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT