Onion Export Issue Saam Tv
महाराष्ट्र

Onion Export Issue : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीला फटका; शेकडो ट्रक सीमेवरच अडकले, शेतकरी अडचणीत

Raju Shetti Letter To PM Modi Over Onion Export Issue: नाशिकमधुन कांदा निर्यातीसंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. भारत बांग्लादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकले आहेत.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

बांगलादेशमधील अराजकतेचा फटका कांद्याला बसत आहे. बांगलादेशमधील अराजकतेमुळे भारताने सीमा सील केलीय त्यामुळे भारत बांग्लादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती मिळतेय. भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती.

बांगलादेशमधील हिंसाचार

नाशिकमधून दररोज ५० ते ६० ट्रक कांदा घेऊन बांगलादेशकडे रवाना होतात. मात्र सीमा सील झाल्यामुळे शेकडो कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले (Onion Export Issue0 आहेत. यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झालेत आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करतो. त्यामुळे शेतमाल निर्यातीवर परिणाम होत आहे. सीमा सुरु होण्यासाठी अजून सहा दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे.

PM मोदींना पत्र

कांदा उत्पादकाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दखल घेतली आहे. त्यांनी बांगलादेश सीमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. बांगलादेशची सीमा खुली करून दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केलीय. केद्र सरकारने (PM Modi) बांगलादेशच्या काळजीवाहू सरकरशी संपर्क साधण्याचे आवाहन केलंय. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं राजू शेट्टी यांनी पत्रात नमूद केलंय.

कांदा निर्यातीला फटका

बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका थेट भारतातील शेतकऱ्यांना बसत आहे. कांद्याची निर्यात रखडल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. शिवाय यामुळे बाजारपेठेत कांद्याचे दर देखील वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात (India Bangladesh Border) आहे. बांगलादेशमधील हिंसाचारानंतर हसीना शेख यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारताचा आश्रय घेतला होता. आता कांदा प्रश्नावर पंतप्रधान मोदी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT