Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price : कांद्याच्या दरात घसरण सुरूच; शेतकऱ्यांकडून ढोल वाजवत मोफत कांदा वाटप

Nashik News : कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ देवळा येथे ढोल वाजवून मोरया प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्यावतीने मोफत कांदा वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून कांदा दर वाढीची मागणी केली जात आहे. मात्र शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. तर देवळा येथे शेतकऱ्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले असून ढोल वाजवत मोफत कांद्याचे वाटप यावेळी करण्यात आले. 

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र नगदी पिक म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. शेतकऱ्यांना शास्वत पिक म्हणून कांदा पिकावर अवलंबून राहवे लागते. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकाच्या निर्याती बाबतच्या धरसोडीमुळे कांद्याचे भाव गडगडले आहे. त्यामुळे हातात आलेला कांदा मातीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांचा खर्च निघणे देखील कठीण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  

कांदा उत्पादनासाठी झालेला उत्पादन खर्च देखिल वसूल होत नाही. इतकेच नाही तर कांद्याच्या दरात वाढ होईल; या आशेने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवणूक करून ठेवला आहे. मात्र हा कांदा देखील किती दिवस साठवून ठेवायचा असा प्रश्न देखील आहे. दरम्यान दरवाढीच्या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार देवळा येथे देखील शेतकऱ्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. 

कांद्याच्या गोण्या वाटप 

देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाचा निषेध म्हणून शेतकरी बांधव मोरया प्रतिष्ठान देवळा यांनी संयुक्तिकरित्या  देवळा येथील पाचकंदिल चौकात आंदोलन केले. येथे कांद्याचे ट्रॅक्टर आणून ढोल वाजवत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गोणी भरून मोफत कांद्याचे वाटप करत आहेत. या अनोख्या आंदोलनामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Passbook Lite : तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे? ‘पासबुक लाइट’द्वारे मिनिटांत समजणार, जाणून घ्या प्रक्रिया

वसईत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग, कंपनी जळून खाक | VIDEO

Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'

Maharashtra Live News Update: राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

SCROLL FOR NEXT