Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price : कांद्याच्या दरात घसरण; ट्रॅक्टर प्रशासकीय कार्यालय आवारात नेत शेतकऱ्यांचे आंदोलन

Nashik News : मागील काही दिवसांपासुन कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून कांदा दर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: उन्हाळ कांद्याचे अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे दर बऱ्यापैकी वाढले होते. यानंतर सद्यस्थितीला कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दरातील घसरणीविरोधात प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले आहे. 

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जात असते. मात्र कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे. दरम्यान नाशिकच्या कळवण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारातून कांद्याचे काढून मानूर येथील प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात नेऊन लिलावसाठी उभे केले. याठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांदा दरवाढ करण्याची मागणी केली आहे. 

कांदा लिलावाची मागणी 

शेतकऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली सरकारने नाफेडच्या माध्यमातून किरकोळ बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आणल्याने कांद्याचे भाव कोसळले असल्याचा आरोप करीत सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच याच ठिकाणी कांद्याचा लिलाव करावा; म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून सरकार पर्यंत कांद्याला काय भाव मिळतोय हे सरकारच्या निदर्शनात येईल अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. 

पावसामुळे कापसाच्या पिकांचे नुकसान 

धुळे जिल्ह्यामध्ये कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केलेली आहे. लागवड केल्यानंतर ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठी कसरत करून कपाशीचे पीक वाढविले. परंतु त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपल्यामुळे कपाशीच्या बोंडांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Crime: आई नाही तर वैरणी! ५ महिनेच्या मुलीसह पोटच्या तीन मुलींचा घेतला जीव, नंतर...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची बंपर स्कीम! दर महिन्याला साठवा ५०००, लखपती होण्याचा सोपा मार्ग

Kalyan : दुकानदार करायचा अश्लील मेसेज; संतापलेल्या तरुणीने दुकानात येऊन चोपला, कल्याणमधील घटना

Bharat Gogawale: मंत्री भरत गोगावले रोहा पालिका मुख्यधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, काय आहे संपूर्ण प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT