Maharashtra Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: 'कांदा खरेदी घोटाळा होत असेल तर कोर्टात जावे', कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या विधानावरुन शेतकरी संतापले; माफीची मागणी

Maharashtra Breaking News: एकीकडे कांदा खरेदीमधील घोटाळ्यावरुन शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असतानाच 'कांदा खरेदी घोटाळा होत असेल तर कोर्टात जावे', असा अजब सल्ला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

अभिजित सोनावणे

नाशिक, ता. ३ जुलै २०२४

कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे कांदा खरेदीमधील घोटाळ्यावरुन शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असतानाच 'कांदा खरेदी घोटाळा होत असेल तर कोर्टात जावे', असा अजब सल्ला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या या दाव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून निषेध

"कृषी मंत्र्यांनी कोर्टात जा असे वक्तव्य करणे ही मोठी खेदाची बाब आहे. मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांचं सरकार तर दुसरीकडे शेतकऱ्यांची लूट होत असताना सरकार म्हणून ज्यांची लूट थांबवण्याची जबाबदारी आहे, ते कोर्टात जा असा अजब सल्ला देत असतील तर हे दुर्दैवी. आहे. कांदा शेतकऱ्यांत प्रचंड संतापाची भावना असून कांदा उत्पादक शेतकरी याचा निषेध करतायत," असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले.

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

"स्वतः कृषीमंत्री हे शेतकरी आहेत. मात्र त्यांना शेतकऱ्यांबाबत किती आस्था आहे हे आज समोर आलं. तुम्हाला कृषिमंत्री म्हणायचं तरी कसं? कृषिमंत्र्यांच्या या शब्दाचा आम्ही निषेध करतो. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, शेतकऱ्याची बाजू धरणारा एकही पक्ष नाही, एकही नेता नाही," असे म्हणत शेतकऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

दरम्यान, नाशिकमध्ये कांदा खरेदी विक्री व्यवहार तपासणीसाठी केंद्रीय पथक दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. या पथकाची नाशिक जिल्हा बँकेत FPO च्या प्रतिनिधीसोबत सध्या बैठक सुरू आहे. सरकारतर्फे कांदा खरेदीसाठी नाफेड तसेच NCCF मार्फत विविध FPO आणि शेतकरी संस्थांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र कांदा खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील संभाजीनगरच्या गॅलॅक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, नंतर UPSC केली क्रॅक; निर्भीड IPS ऑफिसर विकास वैभव यांचा प्रवास

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT