Nashik Corporation Saam tv
महाराष्ट्र

Nashik Corporation : धोकादायक घर रिकामी करण्याच्या सूचना; नाशिक मनपाकडून ७३ मालमत्ता धारकांना नोटीस

Nashik News : पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरांमध्ये सर्व्हे करून धोकेदायक इमारतींची पाहणी केली जात असते. जोरदार पावसात जुने धोकादायक घरे कोलमडणे, पडणे, भिंती कोसळणे असे प्रकार घडण्याची शक्यता अधिक निर्माण होत असते

अभिजित सोनावणे

नाशिक : जुन्या पडक्या असलेल्या धोकादायक इमारती पावसाळ्याच्या दिवसात पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता देखील असते. याकरिता सर्व्हे करून अशा धोकेदायक इमारती खाली करण्याबाबत सूचना केल्या जात असतात. त्यानुसार नाशिक रोड परिसरातील ७३ घर खाली करण्यासंदर्भात नाशिक महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पावसाळा (Rain) सुरु होण्यापूर्वी शहरांमध्ये सर्व्हे करून धोकेदायक इमारतींची पाहणी केली जात असते. जोरदार पावसात जुने धोकादायक घरे कोलमडणे, पडणे, भिंती कोसळणे असे प्रकार घडण्याची शक्यता अधिक निर्माण होत असते. अशा घटना घडल्यास यात वित्तहानी किंवा जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होत असते. यामुळे हि हानी होऊ नये यासाठी पालिकेच मालमत्ता धारकांना घर खाली करण्याचे आवाहन सुरवातीला केले जात असते. त्यानुसार नाशिक महापालिकेने सर्व्हे केला असता (Nashik) नाशिकरोड विभागातील विहित गाव आणि देवळाली गाव येथील घरं धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. 

दरम्यान शहरातील काझी गढी येथील नागरिकांचाही प्रश्न गंभीर आहे. यामुळे खबरदारी म्हणून घरे रिकामी करण्याच्या पालिकेने सूचना दिल्या आहेत. मात्र नाशिकरोड विभागातील विहित गाव आणि देवळाली गाव येथील घरं देखील धोकादायक असून महानगरपालिकेने सर्वेक्षण करून वाडे आणि घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेकडून नाशिकरोड विभागातील साधारण ७३ धोकादायक घरांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT