Sharad Pawar Press Conference Nashik:  Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'लाचारीलाही मर्यादा असते,' जिरेटोप वादावरुन शरद पवार संतापले; प्रफुल पटेलांचा घेतला समाचार

Sharad Pawar Press Conference Nashik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) खासदार प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १६ मे २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) खासदार प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान असल्याचे सांगत विरोधकांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याबाबत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी पटेल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणालेत शरद पवार?

"जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. लाचारी असते नाही असं नाही, पण लाचारीलाही मर्यादा पाहिजे पण सर्व मर्यादा त्या लोकांनी सोडल्यात. एक चांगलं झालं त्यांनी पुन्हा काळजी घेऊ, असं सांगितले," अशा शेलक्या शब्दात शरद पवार यांनी प्रफुल पटेलांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या टीकेवरुनही शरद पवार यांनी निशाणा साधला. "त्यांना बोलायला काही नाही म्हणून ते वारंवार हे बोलत आहेत. शिवसेना आणि शिवसैनिक आज पुन्हा बरोबर आहे, आज महाराष्ट्रात कुठे गेला तरी शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर आहे," असे ते म्हणाले.

राज ठाकरेंना टोला

शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण केले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरही शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला. "राज ठाकरेंचे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे हे मला माहीत नाही. नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, असे म्हणतात मात्र तसे मला नाशिकमध्ये दिसत नाही. असा टोला त्यांनी मनसे अध्यक्षांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेमध्ये मनसेला महाविकास आघाडीची साथ

बायकोच्या मृत्यूनंतर विरह सहन झाला नाही, रक्षा विसर्जनादिवशी नवऱ्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू; सांगलीत हळहळ

Knee Pain: गुडघेदुखीने हैराण आहात? तरुणांपासून वृद्धांपर्यंत गुडघेदुखीवर रामबाण ठरणार 'हा' व्यायाम

IT कर्मचाऱ्याला बलात्कार प्रकरणात अडकवलं, RBL बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं ब्लॅकमेलिंगचं षडयंत्र

Kshipra Joshi: स्पृहा जोशीची बहीण काय करते? गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नोंद

SCROLL FOR NEXT