Saptashrungi Gad Saam tv
महाराष्ट्र

Saptashrungi Gad : सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत गडावर खासगी वाहतूक बंद

Nashik News : नवरात्रोत्सवर कुलदेवतेच्या दर्शनासाठी किंवा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असते. यात सप्तशृंगी गडावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नवरात्रोत्सव काळात शक्तीपीठ असलेल्या स्थळांवर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. यामुळे गर्दीचे नियोजन करण्यास आतापासून सुरवात झाली आहे. दरम्यान साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी असून नवरात्रोत्सवाच्या काळात गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी खासगी वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. यासाठी एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. 

येत्या २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होत आहे. त्यानुसार राज्यातील प्रमुख देवीच्या स्थळांवर मंदिर संस्थांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिवाय गडावर जाण्यासाठी असलेला घाट रस्ता छोटा असल्याने येथे वाहतूक कोंडी होऊ नये. अथवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून खासगी वाहतुकीस गडावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. 

६ ऑक्टोबरपर्यंत वाहतूक बंद 
नवरात्रोत्सवात २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत सप्तशृंग गडावरील खासगी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अर्थात नांदुरी ते सप्तशृंग गड खासगी वाहतूक राहणार बंद असून नवरात्रोत्सवाच्या काळात नांदुरी ते सप्तशृंग गड केवळ एसटी बससेवा सुरू राहणार आहे.  तर भाविकांच्या सोयीसाठी नांदुरी ते सप्तशृंग गड प्रवासासाठी एसटी प्रशासनाकडून २५० एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. 

अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच आराध्य दैवत श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी या दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. श्री एकविरा देवी मंदिर संस्थांच्यावतीने मंदिरातील देवीचे सर्व चांदीचे आभूषण आणि वस्तूंची खास सफाई केली जात आहे. शहरातील सुवर्णकार बांधवांच्या हातून सुरू असणाऱ्या या सफाईमुळं देवीच्या चांदीच्या आभूषणांना नवी झळझळाळी येत आहे. श्री एकविरा देवी मंदिरात देवीच्या आभूषणांसह सर्व चांदीच्या वस्तूंची स्वच्छता शहरातील सुवर्कार सेवा म्हणून करून देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : मासे पकडणे बेतले जीवावर; पाय घसरून तलावात पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Appendix: अपेडिंक्स कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Google Gemini चा वापर करून रेट्रो स्टाईल फोटो कसा बनवायचा?

ITR भरण्याची मुदत सरकारने एका दिवसाने वाढवली, पण ३१ डिसेंबरपर्यंतही भरु शकता इनकम टॅक्स रिटर्न्स

Meghalaya Politics : भाजपला सर्वात मोठा धक्का? अचानक सरकारमधील ६६ टक्के मंत्र्यांचे राजीनामे, मेघालयातील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT