Sanjay Raut Latest News saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'विरोधक मुक्त संसद करण्याचा कार्यक्रम, हिंमत असेल तर...' संजय राऊतांचे मोदी सरकारला थेट आव्हान

Sanjay Raut News: सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. केंद्र सरकारला विरोधक मुक्त संसद करायची आहे.... असे राऊत यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, प्रतिनिधी|ता. २३ डिसेंबर २०२३

Sanjay Raut News:

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजपासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अशातच संजय राऊतही नाशिकमध्ये आलेत. या दौऱ्यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार निलंबन कारवाईवरुन मोदी- शहांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार निलंबनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. "सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. केंद्र सरकारला विरोधक मुक्त संसद करायची आहे. जम्मू काश्मिरमध्ये जवानांची हत्या झाली, मात्र सरकारला त्याची खबर नाही.. अशी टीका राऊतांनी यावेळी केली.

मोदी सरकारला थेट आव्हान...

यावेळी पुढे बोलताना " ईव्हीएम आहे तर सर्व मुमकिन आहे. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणून घेऊन दाखवा, अशी आमची मागणी आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका लढवा. तुम्ही ते ऐकत नाही, कारण तुम्ही हरणार, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. इतर देशात बॅलेट पेपरवर निवडणूका होतात, तुम्ही स्वतःला महाशक्ती समजता, मग बॅलेट पेपरवर निवडणूका का घेत नाही?" असा सवाल राऊतांनी यावेळी विचारला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फक्त विरोधकांवरच कारवाई..

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी कॉंग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मोठे विधान केले. "सुनील केदार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. लढवय्ये नेते आहेत. भाजपचे असे अनेक नेते आहेत त्यांच्यावरती असे अनेक खटले चालले पाहिजेत, कारवाया झाल्या पाहिजे पण न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाया होत आहेत," असे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

Ayurveda Health Care: शिळं अन्न खाताय? ३ तासातच होतील आरोग्यावर परिणाम; आयुर्वेदाचा इशारा

Navratri Fasting Tips: नवरात्रीचा उपवास सोडताना काय खावे अन् काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT