Nashik Accident Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident : बाळंतपणासाठी माहेरी आली येताच घडले दुर्दैवी; रस्ता ओलांडताना ट्रकने चिरडले, मायलेकींसह जन्मापूर्वीच बाळाचाही मृत्यू

Nashik News : नाशिकरोडच्या मुक्तिधाम मंदिर परिसरातील अतिक्रमणच अपघाताला जबाबदार असल्याचा नागरिकांचा आरोप असून यात मायलेकींचा नाहक बळी गेला असून घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : अंगांचा थरकाप उडविणारी घटना नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर घडली आहे. यात अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरील वाहनांना उडवीत जात रस्ता ओलांडत असलेल्या मायलेकीला देखील उडविले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिची गरोदर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 

नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरासमोरील रस्ता नेहमीच अतिक्रमण आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे धोकादायक ठरतो. नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. अशात मंगळवारी संध्याकाळी या रस्त्यावर एक अपघात घडला. या अपघातात आई आणि गरोदर मुलगी रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात ५० वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या गरोदर मुलीचा आणि पोटातील बाळाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

भरधाव ट्रकने उडविले 

बिटकोहून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक भरधाव वेगात येत होता. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने प्रथम कारला धडक दिली. त्यानंतर बाजूला उभ्या दोन रिक्षाही उडवल्या. यानंतर रस्ता ओलांडणार्‍या मायलेकींवर गाडी चढवली. अपघातानंतर जखमींना नागरिकांनी तत्काळ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सुनीता भीमराव वाघमारे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. 

बाळंतपणासाठी माहेरी आली होती मुलगी 

अपघातात सुनीता वाघमारे यांची आठ महिन्यांची गरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे हिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे शीतलचे बाळ रात्रीच दगावले होते. तर उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला. बाळंतपणासाठी ती माहेरी आलेली होती. अतिक्रमण आणि वाहतुकीच्या गोंधळामुळे निष्पाप मायलेकीला आणि जन्माला येण्यापूर्वीच बाळाला प्राण गमवावे लागले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ऑगस्टचे ₹१५०० खात्यात जमा होण्यास सुरूवात, लाडक्या बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन वाजेपर्यंत बंद

Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?

Karishma Sharma Accident: धक्कादायक! धावत्या मुंबई लोकलमधून अभिनेत्रीने मारली उडी; कारण आलं समोर

Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरला चमकणार 'या' राशींचं नशीब; 1 वर्षाने होणार बुध-सूर्याची युती

SCROLL FOR NEXT