Nashik Tourism Saam tv
महाराष्ट्र

Nashik Tourism : नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी नवे नियम लागू; पर्यटन स्थळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

Nashik News : नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे पर्वत रांगांमधून पाणी प्रवाहित होत असून हे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण पर्यटन स्थळांवर जात आहे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : पाऊस पाडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पाहण्यास मिळते. तर धबधबे देखील प्रवाहित होत असतात. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र नाशिक जिल्ह्यात असलेल्या पर्यटन स्थळांवर देखील आता गर्दी होण्यास सुरवात झाली होती. अशात जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. 

नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे पर्वत रांगांमधून पाणी प्रवाहित होत असून हे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण पर्यटन स्थळांवर जात आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून येथे गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडू नये; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी नियम 
नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड आणि अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील धरणं, धबधबे आणि अन्य पर्यटन स्थळांवर देखील नियमांचे पालन करावं लागणार. हरिहर गडावर ३०० पर्यटकांची मर्यादा तर अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी टप्प्याटप्प्याने बॅचेसच्या माध्यमातून पर्यटकांना सोडले जाणार आहे. तर सूर्यास्ताच्या आत पर्यटकांनी पर्यटन स्थळांवरून बाहेर पडावं, यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करण्याच्या सूचना आहेत.  

तर होणार कठोर कारवाई 

तर मुंबई, पुणे अथवा बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे. तर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थांच्या सेवनास बंदी करण्यात आली असून पर्यटन स्थळांवर मद्यपान अथवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Ajit Pawar News : काही लोक विकृत असतात, अजित पवारांनी आमदार सोनवणेंना सुनावले

Maharashtra Politics: मद्य घोटाळ्याचा आर्थिक कणा शिंदेंच्या फाउंडेशनचा! संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा – संजय राऊत|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार? ३००० रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता

Ruchi Gujjar : चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये राडा; अभिनेत्रीने दिग्दर्शक-निर्मात्याला चप्पलने मारले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT