Palghar : वाढवण बंदर ड्रोन सर्व्हेला विरोध; स्थानिकांचे समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन

palghar News : वाढवण बंदरसाठी सुरू असलेला हायटाईड ड्रोन सर्व्हे आज पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान काल हा सर्व्हे ७० टक्के पूर्ण झाला होता. मात्र खराब वातावरणामुळे सर्व्हे बंद करण्यात आल्याचा दावा
palghar News
palghar NewsSaam tv
Published On

पालघर : समुद्राला भरती येत असताना सुद्धा स्थानिकांचे वाढवण बंदर ड्रोन सर्व्हे विरोधातील पाण्यातील आंदोलन सुरूच आहे. मागील अडीच ते तीन तासांपासून समुद्रातील पाण्यात उतरत स्थानिकांनी जलसमाधी आंदोलन और केले. हायटाईड ड्रोन सर्व्हे जवळपास पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

वाढवण बंदरसाठी सुरू असलेला हायटाईड ड्रोन सर्व्हे आज पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान काल हा सर्व्हे ७० टक्के पूर्ण झाला होता. मात्र त्यानंतर खराब वातावरणामुळे हा सर्व्हे बंद करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आमच्या विरोधामुळे हा सर्व्हे बंद करण्यात आल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात उर्वरित सर्व्हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.

palghar News
Nagpur: खेळता-खेळता उघड्या चेंबरमध्ये पडली, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; आई वडिलांचे रडून रडून हाल

अडीच तासांपासून जलसमाधी आंदोलन 

वाढवण बंदराच्या हायटाईड ड्रोन सर्व्हे विरोधात स्थानिकांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन तब्बल अडीच तासानंतर देखील सुरूच आहे. स्थानिकांचा विरोध डावलून जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. काल अपूर्ण असलेला ड्रोन सर्व्हे आज प्रशासनाकडून पूर्ण करण्यात येत आहे. वाढवण बंदर उभारणी विरोधातील स्थानिकांचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेताच बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आल्याचा आरोप करण्यात येत असून पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

palghar News
Badlapur : स्टंटबाजी करत आला आणि महिलेला उडवलं; दुचाकीस्वारावर अद्याप कारवाई नाही

सरकार विरोधात घोषणाबाजी 

दरम्यान स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. सर्व्हे सुरू असताना आक्रमक झालेल्या स्थानिकांनी थेट समुद्रातील पाण्यात उतरत सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मात्र स्थानिकांचा विरोध डावलून प्रशासनाकडून हा सर्व्हे सुरू असून सरकार आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिकांचा बंदराला विरोध का आहे? हे समजून घ्यावं; असं आवाहन यावेळी वाढवण बंदर युवा संघर्ष समितीकडून करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com