Nashik Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon : मालेगावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा; २ कोटी ६९ लाखात फसवणूक केल्याचे उघड, पाच जणांवर गुन्हा दाखल

Nashik Malegaon News : १३ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आल्याचे दाखवत त्यांचे बनावट कागदपत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते. याच्या आधारे संचमान्यता मिळविण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: शिक्षक भरती घोटाळा पुन्हा एकदा मालेगावमध्ये उघड झाला आहे. विशेष म्हणजे शिक्षणमंत्र्यांच्या गावातच हे प्रकार उघड होत असल्याचे समोर येत आहे. आता उघडकीस आलेल्या घोटाळ्यात सेवाज्येष्ठता डावलून मागील १३ वर्षांपासून नियुक्ती करण्यात आल्याचे शिक्षकांना भासविण्याचा आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिकच्या मालेगाव शहरातील उर्दु माध्यमाच्या बडी हायस्कुलमध्ये हा घोटाळा उघडकीस आला आहे. या शाळेत सेवा जेष्ठता डावलून शिक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या शिक्षकांना मागील १३ वर्षा पासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाला दोन कोटी ६९ लाख ५६ हजारांना फसविल्याचे उघडीस आले आहे. या प्रकरणी मालेगावच्या पवार वाडी पोलिसात संस्थाचालक व मुख्याध्यापकासह तीन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकांचे बनावट कागदपत्र सादर करून संचमान्यता 

शाळेत नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून दोन शिक्षिकांची २०१३ मध्ये विनाअनुदानित तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार काम करीत असतांना त्यांना २० टक्के अनुदान तत्वावर लाभ देण्यात आला होता. मात्र याच हायस्कुल मध्ये २०२४ मध्ये १३ शिक्षक २०१२ ते २०२१ या काळात कार्यरत असल्याचे बनावट कागदपत्र सादर करून शिक्षणाधिकारी यांच्याकडे संच मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आणि तो मंजूर होऊन त्यांना १०० टक्के अनुदान लागू झाले.  

पाच जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान या शिक्षकांच्या थकीत वेतानापोटी दोन कोटी ६९ लाख ५६ हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याची दखल घेत पोलिसांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक, वरिष्ठ लिपिक, लिपिक व महापालिका शिक्षण मंडळ शाळेतील एक शिक्षक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, तरीही आरोपी मोकाट,पोलिसांवर प्रश्नचिन्ह|VIDEO

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

SCROLL FOR NEXT