Nashik Crime news saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: सिनेस्टाईल पाठलाग! पोलिसांकडून 54 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, लोकांनी टाळ्या वाजवून केलं अभिनंदन

Nashik Crime News: अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा सिनेस्टाईल 58 किलोमीटर पाठलाग करत तब्बल 54 लाखांचा मद्यसाठा पकडण्यात आला आहे.

अभिजीत सोनावणे

NashiK News: अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा सिनेस्टाईल 58 किलोमीटर पाठलाग करत तब्बल 54 लाखांचा मद्यसाठा पकडण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चांदोरी चौफुलीवर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन्ही संशयितांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांना विंचूर चौफुलीवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मद्यसाठा कुठे उतरणार होता, आता चौकशी सुरू आहे. येवला शहर परिसरात पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे.

पोलिसांनी कशी कारवाई केली?

पोलिसांनी विंचूर चौफुलीवर आल्याचे समजताच पथकाने तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक भरधाव चालवून पलायन केले. पथकाने ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला, त्याला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र ट्रक गर्दीतूनही वेगात पळत राहिला.

पोलिसांनी माईकद्वारे लोकांना बाजूला होण्याचे सांगत हा थरार चांदोरी चौफुलीवर थांबल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवून पथकाचे अभिनंदन केले. ट्रकची तपासणी केली असता गोवा राज्यात निर्मिती विदेशी मध्ये साठा आढळून आला. संशयित चालकाला पथकाने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

साताऱ्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाणे जावळी तालुक्यात धडक कारवाई (Satara) केली आहे. यात दारूबंदी असलेल्या जावळी तालुक्यात तब्बल १ लाख १५ हजार ५०० रुपयांची दारू जप्त केली आहे.

गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातील दारूबंदी असलेल्या जावळी तालुक्यामध्ये चोरून दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो का? BCCI ला अधिकार आहे का, काय आहे नियम? जाणून घ्या!

Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

Maharashtra Politics: फडणवीस-शिंदे यांच्यात शीतयुद्ध पेटणार?

India Pakistan Cricket Match: खेळ मांडला.. ! भारत-पाकिस्तान सामन्याआधीच भाजप सरकार-ठाकरेंमध्ये 'सामना'

SCROLL FOR NEXT