Hotel Owner Killed In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: सख्खा शेजारीच निघाला पक्का वैरी! इडलीच्या गाडीला लाथ मारल्याचा राग, हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

Hotel Owner Killed In Nashik: नाशिकमध्ये हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

तरुणाच्या हत्येने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. इडली-डोसा विक्री करणाऱ्या तरुणाच्या गाडीला लाथ मारल्याच्या रागातून ६ जणांच्या टळक्याने एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने आणि डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या सिटी सेंटर मॉलजवळ असलेल्या क्रांतीनगर भागातील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली. हत्या झालेला तरुण आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारी राहणारे होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. नितीन शेट्टी (४० वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नितीन शेट्टी हे आपल्या संभाजी चौकातील हॉटेलवर असताना घराशेजारील राहणाऱ्या ५ ते ६ जणांच्या टोळक्यांनी येऊन त्यांच्याी वाद घातला. सकाळी तू आमच्या रोजी रोटी असलेल्या इडलीच्या गाडीला लाथ मारली असं म्हणत वाद घातला त्यानंतर नितीन शेट्टीवर हल्ला केला. चाकू आणि कोयत्याने नितीन यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडले. ऐवढ्यावर न थांबत आरोपींनी नितीन यांच्या डोक्यामध्ये दगड घातला.

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नितीनचा जागीच मृत्यू झाला. नितीन शेट्टी यांची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी ६ जणआंविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी टीम तयार केल्या आहेत.

दरम्यान, एमडी ड्रग्स प्रकरणी चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा ड्रग्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या साईनाथनगर चौफुलीवर काही संशयित हे ड्रग्स विक्री करण्याकरता येणार असल्याची गोपनीय माहिती नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर त्यांनी सापळा रचत चार संशयतांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण ३ लाख रुपये किमतीचे ६१ ग्रॅम एमडी ताब्यात घेण्यात आले आहे. अजय रायकर, अल्ताफ शाह, मोहसीन शेख, आकर्षण श्रीमाळ अशी संशयितांची नावे असून पुढील तपास नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT