Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Hospital : नाशिकमध्ये २५० हुन अधिक रुग्णालयांचे फायर ऑडिटच नाही; महापालिकांकडून बजावण्यात आल्या नोटीस

Nashik News : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात शॉर्टसर्किटची घटना मागच्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर नाशिक शहरातील अनेक रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला

Rajesh Sonwane

तबरेज शाखा 
नाशिक
: नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तब्बल २५० रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली असून या नंतर नाशिक महानगरपालिका प्रशासन देखील खळबळून जागे झाले आहे. यानंतर महापालिका प्रशासनाकडून २५० रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात शॉर्टसर्किटची घटना मागच्या आठवड्यात घडली होती. सुदैवाने यात मोठी दुर्घटना घडली नाही. त्यानंतर नाशिक शहरातील अनेक रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेनंतर नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजीज पठाण यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात माहितीचा अधिकार टाकत फायर ऑडिट बाबत माहिती मागविली होती. 

महापालिका प्रशासन झाले जागे 

दरम्यान शहरातील किती खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट करण्यात आले आहे; याची माहिती मागवली होती. यानंतर मिळालेल्या माहितीत सदरची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. अर्थात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत गंभीरता आहे की नाही की नाशिक शहरात मोठी घटनांनंतर महापालिकेला जाग येईल असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित केला जात आहे. 

एकूणच यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेतील अग्निशामक आणि आपत्ती व्यवस्थापक राजेंद्र बैरागी यांची भेट घेतली असता त्यांनी या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे नाशिक महापालिका शहरात असलेल्या रुग्णालयांचे आणि रुग्णांबाबत किती गंभीर आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तब्बल २५० पेक्षा जास्त खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट होत नसेल, तर हा प्रश्न गंभीर असल्याचं देखील याचिकाकर्त्यांनी सांगितलं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT