Bhiwandi : बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, VIDEO

Bhiwandi News : खोदण्यात आलेल्या एका खड्ड्यात पाणी साचले होते. या खड्ड्यात देवव्रत जुगेश पांडे (वय १२) हा चिमुरडा छोटा भाऊ व मित्रांसोबत शिकवणीनंतर घरी येत होता. यावेळी ते खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरले
Bhiwandi News
Bhiwandi NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
भिवंडी
: बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा प्रकल्प उभारणी करण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे. या खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे घडली आहे. दरम्यान बुधवारी या पीडित परिवाराच्या कुटुंबियांना भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे तालुक्यातील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी ठेका घेण्यात आलेल्या कंपनीकडून पिलर उभे करण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. त्यानुसार कोपरगावच्या हद्दीत अशाच प्रकारे खोदण्यात आलेल्या एका खड्ड्यात पाणी साचले होते. या खड्ड्यात देवव्रत जुगेश पांडे (वय १२) हा चिमुरडा छोटा भाऊ व मित्रांसोबत शिकवणीनंतर घरी येत होता. यावेळी ते खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरले. त्यात खड्याचा अंदाज न आल्याने तीबूदल्याने त्याचा मृत्यू झाला. 

Bhiwandi News
Fraud Case : मुलीला तहसीलदार बनविण्याचे आमिष; महिलेची साडेदहा लाख रूपात फसवणूक

दुर्घटना घडल्यानंतर लावले बॅरिकेट्स 

दरम्यान मृत्यूस एल अँड टि कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून दुर्घटना घडल्याच्या दिवशी खड्ड्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते. मात्र दुर्घटना झाल्यानंतर कंपनीने या ठिकाणी बॅरिकेट लावले आहेत. त्यामुळे कंपनीचा हलगर्जीपणा व चतुराई दोन्ही चव्हाट्यावर आली असून या घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केली आहे.

Bhiwandi News
Shahada News : बंदुकीचा धाक दाखवत दोन ट्रक लुटण्याचा प्रयत्न; रोकड घेऊन फरार, एक चोरट्याला पकडले

कंपनीवर कारवाईची मागणी 

दरम्यान सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर बुधवारी खासदार सुरेश म्हात्रे यांनी पांडे कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. खासदार बाळ्या मामा यांनी स्वतः दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यानंतर नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com