Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: फार्मसीच्या विद्यार्थिनीने गच्चीवरून उडी घेत संपवलं जीवन, का उचललं टोकाचं पाऊल? VIDEO आला समोर

Satish Kengar

तबरेझ शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाशिकमध्ये एक विद्यार्थिनीने इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. अनाम खाटीक, असं या तरुणीचे नाव असून ती २२ वर्षांची होती. या घेतानाच सीसीटीव्हीही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनाम ही जे.एम सी.टी कॉलेजमध्ये फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने वडाळा रोडवरील साई नाथ चौफुली येथील प्रतिभा संकुल या व्यावसायिक संकुल गच्चीवरून उडी घेत जीवन संपवलं. इमारतीच्या गच्चीवरून खाली पडल्यानंतर एका दुकानदारांच्या लक्षात हा प्रकार आला. तरुणीच्या कॉलेजचे ओळखपत्राहून तिची ओळख पटली.

अनामने जीवन का संपवलं, याचं कारण अद्याप शपथ झालं नाही. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ही मुलगी या संकुलात का आणि कोणासोबत आली होती? याचा शोध घेतला जात आहे. सीसीटिव्हीची तपासणी सुरू असून सकाळी ती येथे ती कोणासोबत आली होती की एकटी आली होती, याचे फुटेच तपासले जात आहेत.

मुलगी पडल्याचे वृत्त समजताच परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. इंदिरा नगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या तरुणीला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस तरुणीच्या आई आणि वडिलांचीही चौकशी करत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवार 'या' 5 राशींसाठी ठरणार शुभ, देवी लक्ष्मीची होणार कृपा

Assembly Election: डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसची धावाधाव? डॅमेज कंट्रोलसाठी 'मातोश्री'वर चेन्नीथला

Mouni Roy: ओव्हरसाइज कोटमध्ये मौनी रॉयच्या कातिल अदा

Maharashtra News Live Updates: वंचितकडून बीड जिल्ह्यातील ३ उमेदवार जाहीर

Wayanad Loksabha By-Election: भाजपने वायनाडचा उमेदवार ठरवला, प्रियांका गांधींसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या हरिदास कोण आहेत?

SCROLL FOR NEXT