Maharashtra News Live Updates: महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरु

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 October 2024: आज शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीचा जागावाटप निर्णय यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Mumbai News: महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरु

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरु

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मविआच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक

या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नेते उपस्थित

Akola News: अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार कोण?

अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार कोण?

अकोले मतदारसंघात शरद पवार गटात अद्यापही संभ्रम

अमित भांगरे यांच्या नावाची चर्चा असताना आदिवासी नेते मारुती मेंगाळ शरद पवारांच्या भेटीला

सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली आज सकाळी भेट

मारुती मेंगाळ गेल्या दोन वर्षापासून करताय विधानसभा लढण्याची तयारी

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सोशल मीडियावरुन विनयभंग आणि धमकी

पुण्यातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सोशल मिडीयावरुन विनयभंग आणि धमकी

आरोपी विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल

रघुवीर सिंग गुजर असं आरोपीचं नाव. गुजर उदयपूर राजस्थानचा राहणारा

⁠अभिनेत्रीने अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.

⁠आरोपी गुजर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अभिनेत्रीच्या संपर्कात आला.

पुण्यात एकदा प्रत्यक्ष भेट ही झाली

Mumbai News: शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर मातोश्रीवर दाखल

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर मातोश्रीवर दाखल झाले आहेत

त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा थोड्याच वेळात पक्ष प्रवेश करणार आहेत

दहीसर विधान सभा मतदारसंघातून ठाकरे गटातून विनोद घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे

मात्र तीथे तेजस्विनी घोसाळकर यांना तीकीट द्यावे अशी विनोद घोसाळकर यांची इच्छा आहे.

Sindhudurg News: सिंधुदुर्गमध्ये राजन तेली यांचे बांदा येथे कार्यकर्त्यांनी केले स्वागत

सिंधुदुर्गमध्ये राजन तेली यांचे बांदा येथे कार्यकर्त्यांनी केले स्वागत

सावंवाडीत भाकरी परतण्याची वेळ आली आहे.

ही भाकरी राजन तेली परतणार राजन तेली यांनी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्यावर केली टीका

सिंधुदुर्ग मध्ये आल्यावर राणेंवर टीका करणं राजन तेली यांनी टाळले.

सर्वांना बरोबर घेऊन मी पुढे चालणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचया अर्चना घारे नाराज असतील तर त्यांची समजूत घातली जाईल.

Nashik News: अजित पवारांच्या नाशिक दौऱ्याला नरहरी झिरवाळ यांची दांडी

अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची दांडी

अजित पवारांच्या त्र्यंबकेश्वरमधील पहिल्याच सभेला विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ अनुपस्थित

आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज अजित पवार यांचा पहिलाच नाशिक दौरा आणि सभा

Kalyan News: कल्याण पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

कल्याण पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

कोंग्रेस कल्याण पूर्व मतदारसंघाबाबत आग्रही

ठाकरे गट सगळीकडे इच्छुक मात्र त्यांच्याकडे उमेदवार नाही

ठाकरे गटावर उमेदवार आयात करायची वेळ

कोंग्रेस कडे सक्षम उमेदवार

कोंग्रेस पक्षाला एकटे लढण्याची वेळ आली तर ही जागा कोंग्रेस लढवणार

कोंग्रेस पदाधिकाऱ्याची ठाकरे गटावर सडकून टीका

Pune News: पुण्यात महविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक

पुण्यात महविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक

निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीतला सर्व घटक पक्षांची पार पडणार बैठक

बैठकीला काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तीन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आणि मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित

Nashik News: अजित पवार त्रंबकेश्वर मंदिरात दाखल

अजित पवार त्रंबकेश्वर मंदिरात दाखल

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं अजित पवारांनी घेतलं दर्शन

त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा करून घेतले आशीर्वाद

Mumbai News:  उद्धव ठाकरे आणि रमेश चैनीतला यांच्यात बैठक सुरू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्यात बैठक सुरू

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ठरवल्याप्रमाणे नाना पटोले यांच्याशी बातचीत नाही म्हणून नाना पटोले मातोश्रीवर नाही

रमेश चेंनीथला यांच्यासोबत नसीम खान आणि भाई जगताप बैठकीत उपस्थित

विदर्भातील 62 जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये वादाची ठिणगी

22 तारखेपासून फॉर्म चे वाटप करण्यात येणार आहे.. तत्पूर्वी हा तिढा सुटणे महत्त्वाचे आहे..

Ratnagiri News: रत्नागिरीतील 3 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठाचे उमेदवार निश्चित

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठाचे उमेदवार निश्चित

रत्नागिरी मतदारसंघातील उबाठाच्या उमेदवाराबाबत मात्र सस्पेन्स कायम

दापोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम, गुहागरमधून आमदार भास्कर जाधव, राजापूरमधून आमदार राजन साळवी हे उबाठाचे तीन उमेदवार निश्चित

राजन साळवी, भास्कर जाधव 24 ऑक्टोबर रोजी भरणार उमेदवारी अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात उबाठा चार जागा लढवणार

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना उबाठाचा उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप निश्चित नाही

Mumbai News: मुंबईत शिवसेना शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार

मुंबईत शिवसेना शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एकूण 17 जागांवर शिवसेनेने निरीक्षक नेमले होते

आता या 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

तर उर्वरित जागा भाजप आणि अजित दादा यांना देण्यात येणार

Nashik News: त्रंबकेश्वरमध्ये जेसीबीमधून अजित पवार यांचे जंगी स्वागत

त्रंबकेश्वरमध्ये जेसीबीमधून अजित पवार यांचे जंगी स्वागत

जेसीबीमधून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अजित पवार यांचे स्वागत

Pune News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्यात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पुणे दौरा

पुणे मनसे शहरातील आठ ही जागा लग्नासाठी आग्रही

राज ठाकरेंनी उद्या बोलवली पुणे शहरातील मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे शहरातील मनसे कुठल्या जागा लढवणार याकडे लक्ष,तर जिल्ह्यातील आणखी काही जागा मनसे लढण्याची शक्यता

Delhi News: मुख्यमंत्रीपदाचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतरच

मुख्यमंत्री पदाचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतरच

कालच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब नाहीच

मुख्यमंत्रीपदाच्या बाबत अमित शाह यांची 'वेट अँड वॉचची' भूमिका

ज्याच्या जास्त जागा त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळणार ?

पण विधानसभा निवडणुका मात्र एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार

Mumbai News: महायुतीच्या जागावाटपात मुंबई शहरातील ३६ जागांचा तिढा सुटला

महायुतीच्या जागावाटपात मुंबई शहरातील ३६ जागांचा तिढा सुटला

मुंबई शहरातील ३६ विधान सभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार.

त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसला मतदारसंघ मिळणार.

मुंबईतील ३६ विधान सभा मतदारसंघाचे महायुतीचे जागावाटप असे असण्याची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com