Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Nashik News : कांदे घेऊन सरकारच्या कांदा विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. आंदोलनामुळे गोंधळ निर्माण झाला. अखेर निवासी जिल्हाधिकारी रोहित राजपूत यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत संतप्त भावना व्यक्त केल्या

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. कांद्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कांदा फेकून आपला रोष व्यक्त केला. तसेच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदे फोडून आपला निषेध व्यक्त केला. 

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आज कांद्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी अधिकारी वेळ देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. दरम्यान या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच कांदे फोडून रोष व्यक्त करत घोषणाबाजी देखील केली. हातात कांदे घेऊन शेतकऱ्यांनी सरकारच्या कांदा विरोधी धोरणांचा निषेध केला. 

ठिय्या मांडून कांदा भाकर आंदोलन 

दरम्यान आक्रमक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच घोषणाबाजी करायला सुरुवात केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले. तर आंदोलकांनी थेट निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच पुन्हा एकदा कांदे फोडले. तसेच आपल्या सोबत आणलेली शिदोरी सोडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून कांदा भाकर आंदोलन सुरू केले.  

या सर्व परिस्थितीमुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. तर गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असल्याने बाजार हस्तक्षेप योजना राबवण्याची तसेच कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याची मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे. दरम्यान आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निवासी जिल्हाधिकारी रोहित राजपूत यांनी भेट घेत समजूत काढली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Varvarche Vadhu Var: लग्नाआधी एकदा पाहाचं ! लग्नावरचं हलकं फुलकं, प्रभावी नाटक - 'वरवरचे वधू वर'

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

GK: रडताना डोळ्यांतून अश्रू का बाहेर पडतात? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT