Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये १५ लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Liquor Seized in Nashik: केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा नाशिकमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून कारवाई केली.

अभिजीत सोनावणे

नाशिक : दारूची तस्करी व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील दारूची तस्करी सुरूच असल्याचे समोर येत आहे. अशात नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १५ लाख ७१ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला दिव दमन, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा हा नाशिकमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिकच्या बळी महाराज चौकातील सिग्नलजवळ सापळा रचून वाहनांची तपासणी सुरु केली होती. यात पीक अप वाहन आले असता त्याची तपासणी केली. 

मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल 

पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता यात केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी मान्यता असलेले आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी मद्य आढळून आले. तब्बल १५ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला असून वाहनातील चालक सुरज राऊत, पंकज घरटे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी आदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

अमरावतीच्या रतनगंजमधून १२ तलवारी केल्या जप्त
अमरावती : अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रतनगंज येथील एका घरावर धाड टाकून १२ तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रहिम खान युसूफ खान उर्फ रहिम गोटीवाला (वय ४२) याच्या घरातून तलवारींचा साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. रहिम खानने रतनगंज येथील त्याच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर धाड टाकत १२ तलवारी मिळून आल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: 'या' ४ राशींसाठी बुधवार दिवस सोन्यासारखा; वाचा खास राशीभविष्य

Sara Ali Khan: सारा अली खानचा झक्कास लूक, नजरेने सौंदर्याला लावले चारचाँद

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

Marathi Producer Death: साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि निर्माते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

SCROLL FOR NEXT