Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : कौटुंबिक वादातून जावयाने केलं सासू अन् मेव्हणीसोबत भयंकर कृत्य; नाशिक येथील धक्कादायक घटना

Crime News : नाशिकमध्ये किरकोळ कारणातून जीवघेणे हल्ले सुरूच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime News Nashik : नाशिकमध्ये किरकोळ कारणातून जीवघेणे हल्ले सुरूच असून, आज पुन्हा एकदा पंचवटी परिसरातील पेठरोड भागात कौंटुबिक वादातून जावयाने आपल्या सासूसह साळीवर धारदार विळ्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यात साळी गंभीर जखमी झाली असून सासू देखील जखमी झाली आहे. आरती वालझाडे असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, या दाेघींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

पेठरोड दिंडोरी (Nashik) नाक्यावरील अभिषेक स्विटस् मागे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात आरती वालझाडे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. सासू अरुणा लोखंडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा जावई संशयित मनोहर मोंढे याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरु आहेत.

या वादास आरती वालझाडे कारणीभूत असल्याचा आरोप करीत जावई मनोहर मोंढे आणि अरुणा यांचा मुलगा मनिष लोखंडे याने आरतीवर हल्ला केला. आरती ही अरुणा यांची दत्तक घेतलेली मुलगी असल्याची माहिती समोर आहे.

यात मनोहरने विळ्याने वार केल्याने आरतीला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी जिल्हा रुग्णालयात (Hospital) जाऊन जखमींची चौकशी केली, तर दोघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT