Buldhana News : बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या 'छर्रा गँग' च्या आवळल्या मुसक्या

त्यातील दोघांची चौकशी केली असता एका अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला.
Buldhana, Gujarat. Ahmedabad, Police
Buldhana, Gujarat. Ahmedabad, PoliceSaam Tv

Buldhana Police News : बुलढाणा पोलिसांनी आवळल्या " छर्रा गँग " या सराईत आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या. गुजरात राज्यात जाऊन अहमदाबाद येथील छर्रा नगर येथे जाऊन पाेलिसांनी (buldhana police) मोठी कारवाई केली आहे. या गॅंगमधील सहा जणांना अटक (arrest) करण्यात बुलढाणा पोलिसांना यश आले आहे. (Maharashtra News)

Buldhana, Gujarat. Ahmedabad, Police
Chhatrapati Sambhajiraje News: शिंदे- फडणवीसांत नैतिकता असेल तर 'त्या' मगरुर मंत्र्याचा राजीनामा घेतील : संभाजीराजे छत्रपती

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तींकडून लुटमार करून रक्कम लुटणे, कार किंवा दुचाकीच्या डिक्कितील रक्कम लंपास करणे असे गुन्हे वाढले होते. त्यानुसार शेगाव परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना बाळापूर मार्गावर रात्री काही लाेक संशयास्पद आढळले.

त्यातील दोघांची चौकशी केली असता एका अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला. या टोळीतील अनेकजण हे गुजरात मधील अहमदाबाद येथील छर्रा नगर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुजरात येथे जाऊन या परिसरात गुप्त कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.

या सर्वांना पाेलिसांनी बुलढाण्यात आणले. त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. या आंतरराज्यीय टोळीने अनेक ठिकाणी बँकेतील रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना लुटून तसचं कार किंवा दुचाकीच्या डिकीत ठेवलेली रक्कम चोरल्याचे गुन्हे केले आहेत. त्यादृष्टीने पाेलिसांचा कसून तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com