Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: नाकाबंदी करत अडवलेले वाहन सोडवण्यासाठी एक लाखाची मागणी; पोलीस हवालदारासह साथीदाराला अटक

Nashik News : वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराकडे संशयित लाचखोर हवालदार रवींद्र मल्ले याने मोहन तोडी याच्या मध्यस्थीने एक लाख रुपये लाचेची मागणी

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : रस्त्यावर नाकाबंदी करत वाहन अडविले होते. हे वाहन सोडविण्यासाठी पोलीस हवालदाराने एक लाख रुपयांची (Bribe) मागणी केली. मागणी केलेल्या रक्कमेत ३५ हजार रुपये वाहन धारकांकडून (Nashik) स्वीकारताना पोलीस हवालदाराशी एका व्यक्तीला लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

नाशिक तालुका पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विल्होळी पोलीस (Police) चौकी येथे हवालदार रवींद्र मल्ले आणि त्याचा साथीदार (खाजगी व्यक्ती) मोहन तोडी या दोन जणांना एसीबीने अटक केले. नाकाबंदी करत करत अडवलेले वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराकडे संशयित लाचखोर हवालदार रवींद्र मल्ले याने मोहन तोडी याच्या मध्यस्थीने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रंगेहाथ पकडले 

एक लाखाची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले. या रक्कमेपैकी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने धाड टाकत दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT