Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : करन्सी नोट प्रेस भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थीं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार, ७ जणांवर गुन्हा दाखल

Nashik News : भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार १३ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२३ अशी दोन टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी सात डमी उमेदवार दिले

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकर भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. मात्र या परीक्षेत पवई केंद्रावर प्रॉक्सीचा वापर करत परीक्षा उत्तीर्ण होऊन बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पवई पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला त्यांचा शोध सुरु आहे. 

नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली होती. यासाठीची जाहिरात देखील निघाली होती. त्यानुसार भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार १३ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२३ अशी दोन टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सात आरोपींनी कटकारस्थान करून परीक्षेसाठी डमी उमेदवार दिले होते. 

बनावट प्रमाणपत्राच्या साहाय्याने मिळविली नोकरी 

दरम्यान सदरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर या परीक्षार्थीनी बनावट आयटीआय संस्थेचे प्रमाणपत्र तसेच इलेक्ट्रीकल, डिप्लोमाचे प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्र सादर करून नोकरी देखील मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली हा गुन्हा झिरोने पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 

सातही आरोपी बिहारचे 

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा सध्या शोध सुरू आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार, आणि आशुतोष कुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पगारातून एक रुपयाही कापला जाणार नाही, ₹२५,००० च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कडक निर्देश

Maharashtra News Live Update: मानखुर्द मार्केट रोड परिसरातून २ वर्षे ४ महिन्यांचा चिमुकला बेपत्ता

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT