Coriander Price Saam tv
महाराष्ट्र

Coriander Price : कोथंबीरला अवघा १ रुपयाचा भाव; शेतकऱ्याने विक्री न करता रस्त्यावर फेकली कोथंबीर

Nashik News : लिलाव प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोथंबीरच्या जुडीला प्रति जुडी एक रुपया असा दर मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकरी हताश झाला होता. बराच वेळ थांबल्यानंतर देखील कोथिंबिरीचा भाव वाढत नव्हता

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्यासह कोथिंबिरीला चांगला भाव मिळत असतो. मात्र यंदा चित्र उलटे असून कोथिंबीरीचे उत्पादन अधिक झाल्याने बाजार समितीत भाव देखील चांगला मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर आज नाशिक बाजार समितीत कोशिंबिरी विक्रीसाठी आणली असता अवघा एक रुपयाचा दर मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर कोथिंबीर फेकून दिली आहे. 

नाशिकच्या चांदवड तालूक्यातील तळेगावरोही येथिल शेतकरी कैलास नामदेव जीरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेली कोथंबीर विकण्यासाठी नाशिकच्या बाजार समितीत नेली होती. सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोथंबीरच्या जुडीला प्रति जुडी एक रुपया असा दर मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकरी हताश झाला होता. बराच वेळ थांबल्यानंतर देखील कोथिंबिरीचा भाव वाढत नव्हता. यामुळे परत जाण्याचा विचार या शेतकऱ्याने केला. 

माघारी फिरत कोथिंबीर दिली फेकून 

दरम्यान शेतकऱ्याने हताश होऊन कोथंबीरने भरलेली गाडी पुन्हा माघारी फिरवली. यानंतर निफाडच्या रस्त्यावर कडेला गाडी ऊभी करत गाडीतील संपुर्ण कोथंबीर रस्त्याच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला. या दिवसात कोथिंबिरीला चांगला दर मिळत असल्याच्या अनुषंगाने शेतकऱ्याने लागवड केलेली होती. मात्र उत्पादन हाती आल्यानंतर भाव न मिळाल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागले आहे. 

खर्च मोठा उत्पादन शून्य 

शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने बियाणे, खत, ओषध फवारणी करुन पिक हाताशी आले असतांना ती काढण्यासाठी मजूरांची मजूरी असा मोठा खर्च करुन विक्रीला गेला असतांना त्याला जुडीला एक रुपयाचा दर मिळत असेल तर साहजिक त्याचा झालेला खर्च वसूल झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतक-याने सगळी कोथंबीर रस्त्याच्या कडेला फेकून दिली. अर्थात खर्च मोठा पण उत्पादन शून्य असे चित्र सध्या आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

SCROLL FOR NEXT