मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना फ्री हॅण्ड दिला.
नाशिक पोलिसांनी भाजप माजी नगरसेवकाला ताब्यात घेतलं.
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठी मोहीम.
अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी
नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येत आहे, सत्ताधारी भाजपच्याच माजी नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी फ्री हॅण्ड दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील गुन्हेगारांवर पोलिसांची नजर आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शहरातील गुन्हेगारांनी खाकीचा धसका बसला असून अनेकांनी नाशकातून पलायन केलंय. दरम्यान नाशिक पोलिसांच्या रडारवर आता गुन्हेगारांना राजाश्रय देणारे आलेत.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली होती. गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आलेत. गु्न्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना फ्री हॅण्ड दिला आहे. दोन दिवसापूर्वीच मामा राजवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याआधीच ही कारवाई करण्यात आली होती.
आताही भाजपचे माजी नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दहशत माजवणे, खंडणी, भाईगिरी करणे अशा आरोपाखाली भाजपच्या नेत्याला पोलसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारीत अनैसर्गिक वाढ झाली होती, ती कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हला फ्री हॅन्ड दिला आहे . नाशिककरांनीही विश्वास दाखविला आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. सर्वच राजकिय पक्षातील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर काम करतोय. एक ग्रुप स्थापन करणे, गँग तयार करणे, गरीब लोकांची पिळवणूक करणे, त्यांच्या जमिनी टपऱ्या हडप करणे, या संदर्भात कारवाई केली जात आहे.
कोणी आम्ही सरकार आहोत, बॉस आहोत अशी होर्डिंग लावत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जातेय. गुन्हेगारी टोळ्या चालवल्या जात आहेत, त्याची काय मोडस आहे, ते जाणून घेऊन आम्ही कारवाई करत आहोत. अनधिकृत होर्डिंग लावणे, बॅनर लावणे लोकांच्या मनात भिती निर्माण करायची, असे बॅनर लावणे, यावर कारवाई केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.