
रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सचिन घायवळसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
निलेश घायवळ प्रकरणावरून सरकार आणि भाजपवर तीव्र टीका होतेय.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली.
गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गुन्हेगारीला काही लोकांकडून राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढण्याचा निर्णय घेतलाय, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून दिला होता. पण आता मात्र स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांचे नाव घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
निलेश घायवळ प्रकरणावरून सरकारची कोंडी झाली आहे. विरोधांकडून टीका केली जातेय. कोथरुडमधील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेलाय. दरम्यान घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केल्यापासून नवनवीन खुलासे उघडकीस येत आहे. दररोज नवनवीन राजकीय नेत्यांसोबत घायवळ संपर्कात होता. शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप नेते राम शिंदे यांचे निलेश घायवळसोबत संबंध आहेत.
त्यांच्या सांगण्यावरून त्याच्या भावाला शस्त्रपरवाना मिळवला असेल, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. इतकेच नाहीतर राम शिंदेंच्या प्रचार सभेत निलेश घायवळ प्रचारासाठी आला होता असा दावाही रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. रोहित पवारांवर टीका करण्यात आली. त्यानंतर आता रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि निलेश घायवळ यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ एका प्रचार सभेतील आहे. ही प्रचारसभा कर्जत जामखेड मतदारसंघातील होती.
या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावर सचिन घायवळ होता. विशेष म्हणजे ही सभा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली होती. फडणवीस यांनी त्या सभेत सचिन घायवळ याचं नाव घेतलं होतं. तसेच सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेतही देवेंद्र फडणवीस यांनी त्यंचे नाव घेतलं होतं, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.
दरम्यान घायवळ प्रकरणात अनेक भाजप नेत्यांची नावे समोर येत आहेत. आधी चंद्रकांत पाटील, नंतर राम शिंदे आणि आता खुद्द देवेंद्र फडणवीस याचे नेवा जोडले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.