Nashik News  Saam tv
महाराष्ट्र

Nashik : सिग्नलचा नियम पाळणं बेतलं जीवावर; पाठलाग करत कार चालकाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

Nashik News : सिग्नलवर थांबून नियमांचे पालन करणे महत्वाचे असते. तर नियम न पाळणाऱ्या वाहचालकांना वाहतूक शाखेकडून दंड आकारण्यात येत असतो. अर्थात सिग्नलचे नियम न पाळल्यास वाहन चालकांना महागात पडत असते

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : चौकांमध्ये असलेल्या सिग्नलवर न थांबता नियमाचे पालन न केल्याने महागात पडत असते. मात्र सिग्नलवर थांबून नियम पालन करणे एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतले. सिग्नल न रोडल्याने कारचालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग करत कार अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

शहरातील रहदारीवर नियंत्रण राहावे यासाठी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा असते. सिग्नलवर थांबून वाहतूक नियमांचे पालन करणे महत्वाचे असते. तर नियम न पाळणाऱ्या वाहचालकांना वाहतूक शाखेकडून दंड आकारण्यात येत असतो. अर्थात वाहतूक नियम न पाळल्यास वाहन चालकांना महागात पडत असते. मात्र नाशिकमध्ये तर एका दुचाकीस्वाराने नियमांचे पालन केल्याने जीवावर बेतल्याचा प्रकार घडला आहे. 

सिग्नलवर काटेकोर केले पालन 

नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील हि धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकरोडवरून एक दुचाकीस्वार जात होता. त्याच्या मागे एक कार देखील होती. लाल सिग्नल सुरु झाल्याने एका दुचाकीस्वाराने नियमांचे पालन म्हणून दुचाकी थांबविली. याचवेळी मागून आलेल्या कार चालकाने त्याला सिग्नल तोडून जाण्यास सांगितले. परंतु सदर दुचाकीस्वाराने त्याच्याकडे दुर्लक्ष करत सिग्नल सुटल्यानंतरच गाडी पुढे मार्गस्थ केली. 

दुचाकीला धडक देत अंगावर घातली कार 

दरम्यान सिग्नल तोडला नाही, म्हणून कार चालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सिग्नल तोडला नाही म्हणून संतापलेल्या कारचालकाने गाडी थेट तरुणांच्या अंगावर घातली. तर चालत्या गाडीने दोन वेळेस दुचाकीला धडक देत तिसऱ्यांदा गाडी थेट अंगावर घातली. घटनेत दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर कारचालक शाहरुख शेख फरार झाला होता. यानंतर सापळा रचून शाहरुख शेख याला पोलिसांनी अटक केली. घटनेचा थरार मुलांनी लावलेल्या हेल्मेट कॅमेरात कैद झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! रस्ता ओलांडताना ट्रेलरने उडवले, आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू; भंडाऱ्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT