Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : तिकीटासाठी आमदारांना फोन करत मागितले ५० लाख; नाशिक पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Nashik News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सगळ्याच पक्षातून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा घेत दोघेही महाविद्यालयीन तरुणांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना फोन केला

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: भाजपाचे विद्यमान आमदारसह राज्यातील इतर आमदारांना विधानसभेची उमेदवारी पाहिजे असेल तर ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैशांची मागणी करणाऱ्या दोघेही महाविद्यालयीन तरुण नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सगळ्याच पक्षातून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा घेत दोघेही महाविद्यालयीन तरुणांनी सत्ताधारी पक्षाचे (Nashik News) नाशिकचे विद्यमान आमदार यांना आम्ही पीएमओ कार्यालयातून बोलतो आहे. तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील; असे दूरध्वनी वरून सांगण्यात आले. मात्र विद्यमान आमदारांना शंका आल्याने त्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकार वडा पोलीस (Nashik Police) ठाण्यात अज्ञात विरोधात तक्रार दिली होती.  

नगर, ठाण्याच्या आमदारांनाही केला फोन 

सदर घटनेचे गांभीर्य बघता पोलीस आयुक्त यांनी याचा तपास गुन्हे शाखे युनिट एकला दिला होता. गुन्हे शाखेने याचा तपास करत फोन करून पैशांची मागणी करणाऱ्या दोघा तरुणांना दिल्लीहून ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी नाशिक शहरात भाजपचे विद्यमान आमदार तसेच नगर आणि ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदारांना फोन केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Reforms : सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, २२ सप्टेंबरनंतर जुन्या वस्तूच्या विक्रीवर टाकली अट; वाचा सविस्तर

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे अपघातात मुलगा गेला; उल्हासनगरातील सरोज कुटुंबीयांची अवस्था बिकट, रेल्वेकडून घोषित मदतीची प्रतीक्षा

सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 3D फोटो कसा बनवायचा?

Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची भन्नाट लव्ह स्टोरी; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचा टीझर पाहिला का?

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला वेग? उद्धव ठाकरे अचानक पोहचले राज ठाकरेंच्या शिवतिर्थावर

SCROLL FOR NEXT