Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात; २१ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात; २१ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिक शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या एका टोळीला (Nashik) नाशिक पोलिसांनी धुळे (Dhule) येथून सापळा रचून अटक केली आहे. या टोळीकडून २१ लाखांचे दागिने आणि मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत असताना धुळे येथील एक टोळी शहरात घरफोडी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शहरातील पंचवटी येथील एक रिक्षा चालक बंद घरांची रेकी करून ती माहिती धुळे येथील मित्रांना देत होता. अंबड पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पोलिसांनी धुळे येथून काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली.

दागिने, मोबाईल, कारसह मुद्देमाल जप्‍त

या टोळीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले. या टोळीकडून सोने, चांदी, कार, मोबाईल, टीव्ही असा एकूण २० लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती (Police) पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Dark Chocolate Cake: वजन आणि हृदयासाठी फायदेशीर डार्क चॉकलेट केक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT