Nashik News ATM Crime
Nashik News ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: एटीएम सेंटरमध्ये युवतीला गंडा; पैसे काढून देण्याच्‍या बहाण्याने बदलविले कार्ड

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने चुना लावला. यात सात जणांच्या टोळक्याने एटीएम कार्डाची अदलाबदल करुन तिच्या वडिलांच्या बँक खात्यातून १९ हजार रुपये लांबविल्याची घटना बोधलेनगरात घडली. यासंदर्भाने गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरु केला आहे. (Maharashtra News)

लंबोदर पार्कमधील मनाली प्रमोद दोंदे ही तरुणी पैश्यांची आवश्यकता असल्याने मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता पुणे रोडवर असलेल्या बोधले नगरमधील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेली. त्याचवेळी (ATM Crime) एटीएम सेंटरच्या आजूबाजूला सात संशयितांनी तिला हेरले. ‘आम्हीही पैसे काढण्यासाठीच आलो आहोत’, असे भासवून गर्दी केली. 30 ते 50 वयोगटातील या संशयितांनी एटीएम सेंटरमध्ये गर्दी करुन लवकर पैसे काढा, आम्हाला वेळ होत आहे; असे बोलून तरुणी मशिनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया करत असताना चोरुन तिचा एटीएम पीन पाहून घेतला.

तांत्रिक कारण देत दिले दुसरे एटीएम

त्यानंतर ‘पैसे काढायला मदत करतो’ असे सांगत हातचलाखीने तिचे एटीएम कार्ड (ATM Card) ताब्यात घेतले. मात्र, खोटे व तांत्रिक अडचणीचे कारण देत पैसे निघत नसल्याचे सांगून तिच्या एटीएम कार्डासारखेच कार्ड तिला दिले. त्यामुळे ती बाहेर गेली. त्याचवेळी संशयितांनी तिच्याकडील एटीएम कार्डाचा गैरवापर करुन तिच्या वडिलांच्या बँक (Bank) खात्यातून एकदा 10 हजार व दुसऱ्यांदा 9 हजार असे 19 हजार रुपये काढून पळ काढला.

पैशांचा मॅसेज आल्‍यावर झाला उलगडा

दरम्यान, बँक खात्यातून एवढे पैसे वजा झाल्याचे मनालीच्या वडीलांना कळाले. त्यांनी तिच्याकडे विचारणा करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ मुंबई नाका पोलिसांत तक्रार दिली. उपनिरीक्षक पंकज सोनवणे हे तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT