Bike Theft CCTV Video  saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये चक्क महिलेने चोरली दुचाकी, घटना CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडिओ

Bike Theft CCTV Video : नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरातील एका सोसायटीच्या पार्किंमधून महिलेने बाईक चोरून नेली.

Chandrakant Jagtap

>> तबरेज शेख, नाशिक

Nashik Bike Theft News : तुम्ही आझपर्यंत पुरुष चोरट्यांनी बाईक चोरल्याचे ऐकले किंवा पाहिले असेल. परंतु नाशिकमध्ये चक्क एका महिलेने बाईक लंपास केली आहे. नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरातील एका सोसायटीच्या पार्किंमधून एका महिलेने बाईक चोरून नेली आहे. ही चोरी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये दुचाकी चौरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र आता त्यात महिला चोरांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरातील श्री आंबा सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिलेने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अमोल सॅम्युअल गायकवाड यांची दुचाकी उभी होती. ती दुचाकी एका अज्ञात महिलेने चोरून नेली आहे. महिलेने दुचाकी चोरल्याची घटना सोसायटीत लावलेल्या CCTV कॅमेरात कैद झाली आहे.

तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता, तोंड बांधून पायी चालत आलेली ही महिला श्री आंबा सोसायटीमध्ये आली आणि तिने पार्किंगमध्ये उभी केलेली गायकवाड यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस CCTV फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

यशोमती ठाकूर यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 'भाऊ, भाई, दादा...'

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते ऍड मंगेश ससाणेयांच्या गाडीवर बीड माजलगाव मध्ये हल्ला

Education Department : शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मुंबईतील २ दिग्गज शाळांची मान्यता रद्द

Mahindra Scorpio N: कार खरेदीचा प्लॅन आहे? थांबा! Mahindra Scorpio N Facelift लवकरच येणार; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Badlapur : बदलापूर स्टेशनवर राडा, जोधपूर एक्सप्रेस प्रवाशांनी रोखली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT